Tipper seized Parbhani Pudhari
परभणी

Illegal Sand Transport | बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई: ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

चारठाणा पोलिसांनी सावरगाव तांडा परिसरात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Tipper seized Parbhani

चारठाणा : चारठाणा पोलिसांनी सावरगाव तांडा परिसरात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी २५ मार्च रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून हा टिप्पर पकडला.

एमएच ४० सीडी ०९८८ क्रमांकाच्या या टिप्परमध्ये अंदाजे चार ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी सुमारे चार लाख रुपये किंमतीचा टिप्पर आणि २० हजार रुपये किंमतीची वाळू असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत कालवणे यांच्या फिर्यादीवरून चालक अमन करीम शेख (रा. गुलशन कॉलनी, जिंतूर) याच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१/२०२०, कलम ३०३ (२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT