चारठाणाः दुचाकीला वाचवण्यास गेलेल्या स्विफ्ट डिझायर कारची समोरुन येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 3 जण ठार झाले आहेत तर आठ जण जखमी झाले आहेत. नांदेड संभाजीनगर राज्य महामार्गावरील गणेशपुर जवळ हा अपघात झाला.
स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 12 जीएफ 62 59 व मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 20 डी डी 76 66 ची दुचाकी ला वाचविण्यासाठी गेले असता दोघाची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये स्विफ्ट डिझायर मधील सय्यद आबेद अली सय्यद महबूब अली वय 38 वर्ष, सय्यद सुमय्या सय्यद आबेद अली वय 35 वर्ष, व जुने दा मरियम सय्यद आबे द आली वय नऊ वर्ष (रा.बसमत) हे तिघेजण जागीच ठार झाले
तर सय्यद इस्माईल महबूब अली, सय्यद फरवा सय्यद आबेद अली वय चार वर्ष , सय्यद उफद सय्यद आबेद अली वय सात वर्ष हे जखमी झाले आहेत. या जखमींना जालना येथील रुग्णालयात दाखल केले असून स्विफ्ट डिझायर मध्ये सहा जण एकाच घरातले होते ते वसमत येथून आपल्या बहिणीकडे ईद निमित्त भेटायला जात होते. तर मिनी ट्रॅव्हल्स संभाजीनगरहून शेकमाक येथे रमजान ईद ला भेटण्यासाठी जात होते.
या मिनी ट्रॅव्हल्स मध्ये 13 जण होते यातील अशफाक कुरेशी वय साठ वर्ष, अक्रम खान वय 61 वर्ष, फैमुदा अक्रम खान वय 55 वर्ष, मसीउल्ला बेग वय साठ वर्ष, शाहिदा बेगम वय 55 वर्ष, अबरार कुरेशी वय 35 व समीउल्ला खान हे सर्व राहणार संभाजीनगर येथील असून या सर्व जखमींना जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डिझायर मधील सय्यद इस्माईल महबूब हे ही जखमी झाले आहे ही घटना दिनांक २२ मार्च रविवारी दुपारी दीड वाजता घडली या घटनेची माहिती मिळता च चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, पोलीस उपनिरीक्षक बी व्ही झुंजुर्डे, बीट जामदार उद्धव माने, बीट जामदार हरी गायकवाड, गजानन झोरे आदींनी घटनास्थळी जाऊन जखमींना ॲम्बुलन्सधून उपचारासाठी पाठविले दरम्यान या घटनेची माहिती मिळतात महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक नेवल, बालासाहेब गिराम, भागवत घोडके, मनोहर हाके, सूर्यकांत हाके , महेश केदारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी मदत केली