परभणी

परभणी : मानवत पालिकेच्या कारवाईत प्लस्टिक कॅरीबॅगचा ८३ किलो साठा जप्त, २३ हजाराचा दंड वसूल

backup backup

मानवत; पुढारी वृत्तसेवा : बंदी असूनही प्लास्टिक कॅरीबॅग व प्लास्टिक वस्तू विकणाऱ्या व वापरणाऱ्या दुकानदाराविरुद्ध मानवत पालिका प्रशासनाने आज  (दि. १) धडक कारवाई केली. या कारवाईत ८३ किलो प्लास्टिक जप्त करीत २३ हजाराचा दंड ठोकला .

शहरांमधील मुख्य बाजारपेठ व इतर ठिकाणी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावरे यांनी स्वतः पालिका कर्मचारी यांना सोबत घेत प्लास्टिक कॅरीबॅग जप्ती करून दंडात्मक कार्यवाही मोहीम राबवली. शहरांमध्ये स्वच्छता अबाधित राहावी व रोगराई कमी व्हावी या उद्देशाने सदरील मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील सर्व व्यापारी, फळ विक्रेते, किराणा दुकान, कापड दुकान इत्यादी ठिकाणी धाडी टाकत ८३ किलो प्लास्टिक व प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहे. दंडात्मक कार्यवाही मध्ये रू.23300 चा दंड वसूल करण्यात आला आहे. यानंतर मुख्याधिकारी यांनी बोलताना असे सांगितले की प्लास्टिक व प्लास्टिक कॅरीबॅग वापर करणाऱ्या वरती कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यास प्लास्टिक बंदी हा महत्त्वाचा भाग आहे यामुळे यावरती विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी प्लास्टिक व प्लास्टिक कॅरीबॅग याचा वापर करू नये व प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

या मोहिमेत नगर अभियंता सय्यद अन्वर,कार्यलीयन अधीक्षक भगवान शिंदे,आर बी चव्हाण, भारत पवार, एस.एस जोशी , मुंजासा खोडवे, एस.बी उन्हाळे, वंदना इंगोले, दीपक सातभाई, एस.एन रुद्रवार ,पी आर पवार , विनय आडसकर, एस.एस काळे, सय्यद जावेद, सुनील कीर्तने, संजय कुऱ्हाडे ,दीपक भदर्गे, संजय दवणे, रवी धबडगे, बाळू लाड, बळीराम दहे, अलीम अन्सारी, रितेश भदर्गे सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT