मानवत : पुढारी वृत्तसेवा
रस्ता ओलांडताना भरधाव वेगातील असलेल्या ट्रकखाली येऊन एका (६५ वर्षीय) जेष्ठ नागरिकाचा चिरडून जागेवरच मृत्यू झाला. ही घटना (मंगळवार) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मानवत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर एम आर एफ शोरूम जवळ घडली.
नागोराव गंगाराम जोहरुले (वय ६५) रा. कोथाळा ता. मानवत हे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते तहसीलच्या कामासाठी सकाळी मानवतला आले होते. काम झाल्यानंतर ते राष्ट्रीय महामार्गावरून परत बसस्टँडकडे येत होते. एम आर एफ शोरूम समोरून रस्ता ओलांडताना पाथरीहून परभणीला जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रक (क्रमांक एम एच १६ सीसी ७४७५) च्या चाकाखाली आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करून ट्रक ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.