पाथरी, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित जनसंवाद दौरा व कार्यकर्ता मेळाव्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे मंगळवारी परभणी व पाथरीत दाखल होणार आहेत.
परभणीत खानापूर फाट्याज वळील मैदानावर दुपारी ४ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर पाथरीत अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी येथील अंजली मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्यात खा. शिंदे मार्गदर्शन करतील. पाथरी मतदारसंघातील शिवसैनिकांनी ३ हजारोंच्या संख्येने हजर राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, युवा जिल्हाप्रमुख अमोल भाले पाटील, तालुकाप्रमुख विठ्ठल रासवे, शहरप्रमुख युसूफुद्दीन अन्सारी यांनी केले आहे.
काही दिवसांत विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजेल. यातच शिवसेनेतर्फे पाथरी मतदारसंघासाठी सईद खान हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. यामुळे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा मानला जातो. मंगळवारी सायं. ६ वाजता होणाऱ्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी साईबाबांची जन्मभूमी असलेल्या येथील साईबाबा मंदिरात खा. शिंदे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून भव्य मेळावा सुरू होणार आहे.
सईद खान यांनी २ वर्षापासून शहरासह ग्रामीणमध्ये विविध कामे राबवत जन- तेचा विश्वास संपादन केला. साई मंदिर विकास आराखड्यानिमित्त शहरासाठी ९१ कोर्टीचा निधी मंजूर करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे त्यांचे शहरासह मतदारसंघात मोठे जनमत तयार झाले. मतदारसंघातील सर्व गावांत तरुण, होतकरू शिवसैनिकांची मोठी फळी उभी करण्यातही त्यांचे कष्ट, मेहनत आहे. कामांसह सर्वसामान्य शिवसैनिकांच्या प्रत्येक कामात ते उभे असल्याने तालुक्यातील युवकांत मोठा विश्वास निर्माण झाला. ही सैनिकांची फळी त्यांच्या विजयासाठी तळमळीने परिश्रम घेणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.