जिंतूर : परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना बोर्डीकर-साकोरे आणि त्यांच्या वडील, माजी आमदार, यांच्याविषयी सोशल मीडियावर आपमानास्पद, बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी विष्णू नागरे यांच्या विरोधात जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजी दत्तराव कदम यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २६ जुलै २०२५ रोजी भाजपा कार्यालय, जिंतूर येथे बसलो असताना, फेसबुक या सोशल मीडियावर माझी बहीण व राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या बद्दल विष्णू नागरे यांनी अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर प्रकाशित केला. त्यामुळे माझ्या आणि मा.ना. सौ. मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या भावना दुखावल्या आहेत.
या प्रकरणी योग्य आणि कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, २८ जुलै २०२५ रोजी भादंवि कलम ७९, ३५६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहेत.