पूर्णा : शहरात विजयादशमी सणाच्या शुभ मुहूर्तावर गुरूवारी (दि.२) फुल उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडूफुले विक्रीसाठी आणली आहेत. ऑरेंज व पिवळ्या रंगाची झेंडूफुले पूर्णा तालुक्यासह हिंगोली, वसमत, सेनगाव तालुक्यातील शेतकरी झेंडूफुले दिवसभर बसून विकत होते. सदरील झेंडूफुलांना यंदा प्रति किलो ७० ते ८० रुपये दर मिळत होता.
यावर्षी अतिवृष्टीमुळे झेंडूच्या बागांची मोठी हानी झाल्यामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात झेंडूफुलांची आवक दरवर्षीच्या तुलनेत मंदावून भाव वधारल्या गेले. विजयादशमी सणाच्या मुहूर्तावर महिला व पुरुष नागरीक शेतकरी बांधव दुर्गामाता मुर्तीस पुष्पहार चढवणे तसेच दुचाकी, तिनचाकी, चारचाकी वाहनांची पुजा अर्चा करुन हार घालण्यासाठी झेंडुफूलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या अनुषंगाने बरेच शेतकरी विजयादशमी (दसरा) आणि दिवाळी सणाच्या मुहूर्तावर श्री लक्ष्मीपुजनासाठी झेंडुफूलांचे उत्पादन घेत असतात.
गतवर्षी प्रति किलो ३० ते ४० रुपये झेंडुफूलांना दर मिळाला होता. परिणामी, शेतकऱ्यांना फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. तर या उलट झेंडुफूलांना चांगला दर मिळत असल्याने फुले उत्पादक शेतकरी काही अंशी समाधान दिसून आले तर ग्राहक मात्रं दर वाढीमुळे कासकुस करत होते.
औंदा चांगला दर मिळतोय, त्यामुळे झेंडूफुले परवडताहेत आम्ही दरवर्षी दसरा व दिवाळी सणाच्या अनूषंगाने थोडक्या का क्षेत्रात होईना झेंडुची लागवड करतोत.यंदा देखील अर्धा एकरावर झेंडुची लागवड केली असून ती आज पूर्णा मार्केट मध्य सेनगाव हून झेंडुफूले विक्रीसाठी आणलेत.प्रति किलो ८० रुपये भाव मिळत असल्यामुळे झेंडुफूले उत्पादन परवडू लागले आहेत.गेल्या वर्षी कमी दर मिळाल्याने उत्पादन खर्चही निघाला नव्हता.शिवशंकर आलेवार, झेंडुफूले उत्पादन शेतकरी (रा. पानकन्हेरगाव,ता सेनगाव जि हिंगोली)