Manoj Jarange Patil File Photo
परभणी

Manoj Jarange | मुंबई येथील मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी

29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी बैठक

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : येथील नवामोंढा भागातील हनूमान मंदीरात ता १८ ऑगस्ट रोजी दुपारी सकल मराठा समाज बांधवांकडून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या ता २९ ऑगस्ट रोजी पासून सुरु होणाऱ्या आंदोलनासाठी भव्य बैठक घेण्यात आली.

यात,तालूक्यातून लाखोंच्या संख्येने अंतरवली सराटी असो की मुंबई येथे जाण्यासाठी जय्यत नियोजन करण्यात आले. तत्पूर्वी, जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा ठरला होता, त्या निमित्ताने येत्या २० ते २३ ऑगस्ट तारीख दरम्यान पूर्णा येथे भव्य सभा घेण्यासाठी नियोजन केले जात होते. मात्र, जरांगे पाटील यांच्या ताब्यातीची काळजी घेण्याच्या अनुषंगाने दौरा निश्चित झाला नसल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतरवली सराटी अथवा ऐनवेळी ठरले तर मुंबई येथे मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी अमरण उपोषण, मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे जरांगे पाटील सांगतील तिथं जाण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी सज्ज रहावे. यासाठी मराठा समन्वयक पुंडलिक जोगदंड, गजानन जोगदंड, ज्ञानोबा माऊली कदम, निलेश धामणगावे, शरद कदम, रमाकांत क-हाळे, निवृत्ती नवघरे सह आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीस शहर व ग्रामीण भागातील असंख्य सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT