Illegal Money Lending Pudhari
परभणी

Illegal Money Lending : जिंतूरमध्ये अवैध सावकारीचे जाळे फोफावले

फायनान्सच्या नावाखाली आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर : शेती, लग्नकार्य, आजारपण किंवा तातडीच्या गरजांसाठी पैशांची नड असलेल्या सर्वसामान्यांना हेरून जिंतूर तालुक्यात अवैध सावकारीचे जाळे वेगाने विस्तारत आहे. शहरासह बोरी, चारठाणा, येलदरी, इटोली आदी गावांत फायनान्स व खासगी कर्ज पुरवठ्याच्या नावाखाली बेकायदेशीर आर्थिक व्यवहार सुरू आहेत. काही ठिकाणी दरमहा १० ते २० टक्क्यांपर्यंत अवाजवी व्याज आकारले जात असून चक्रवाढ पद्धतीमुळे कर्जदार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत.

वसुलीसाठी दमदाटी करणे, कोरे चेक व स्टॅम्प पेपरवर सह्या घेणे, घरासमोर गोंधळ घालून अपमान करणे अशा प्रकारांमुळे कर्जदारांवर मानसिक दबाव वाढला आहे. जिंतूर तालुक्यात शासनमान्य परवाना असलेले केवळ १२ सावकार आहेत.

प्रत्यक्षातील बिनपरवाना सावकारीचे पेचाड पाहता सहकार विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

लेखी तक्रार करा; नाव गोपनीय ठेवू- "अवैध सावकारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पीडितांनी सहकार विभागाकडे लेखी तक्रार करणे आवश्यक आहे. त्रास देणाऱ्यांची माहिती देणाऱ्या तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवून नियमानुसार कारवाई केली जाईल; तसेच पोलिसांत गुन्हाही दाखल केला जाईल."
नांदापूरकर, सहायक निबंधक, जिंतूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT