Jintur farmers protest pudhari photo
परभणी

Jintur farmers protest : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

पिकांची अवस्‍था बिकट : घोषणाबाजीतून वेधले सरकारचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर : पावसाने मोठी ओढ दिल्याने तालुक्यातील शेती संकटात सापडली, अनेक महसूल मंडळांमत खरीप पिकांची अवस्था बिकट झाली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे उभी पिके वाया जाण्याच्या मार्गावर असताना शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना कराव्या, या मागणीसाठी शनिवारी (दि.२६) पांगरी पाटी येथे शेतकऱ्यांनी भव्य रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी सहभागी होवून मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले.

जिंतूर तालुक्यातील सर्व महसूल मंडळांत पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. पिकांना आवश्यक त्या कालावधीत पाऊस न मिळाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांनी खरीपासाठी केलेला खर्चही भरून निघण्याची परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे शासनाने कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी करावी व तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.

तालुक्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा म्हणून हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत द्यावी, असेही नमुद केले. पीकविम्याची ५० टक्के अग्रिम भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, आगामी रब्बीसाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व इतर आवश्यक निविष्ठांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखांचेे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, जिंतूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी येलदरी आणि सिद्धेश्वर धरणातून कालवा काढावा, तसेच करपरा नदीचे खोलीकरण आणि सरळीकरण करावे, जेणेकरून पावसाचे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करता येईल, दुष्काळी परिस्थितीत पिके वाचविण्यासाठी उपलब्ध सिंचन स्रोतांचा वापर करणे आवश्यक असल्याने कृषी पंपांसाठी पूर्ण दाबाने व मुबलक वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

शासनाने तातडीने मागण्यांची दखल घेत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी दिला. आंदोलनात इरशाद पाशा चांद पाशा, ॲड.माधुरी क्षीरसागर, गजानन पालवे, खंडेराव बुधवंत, सोपान नाईक, आदिनाथ बुधवंत, केशव चांदणे, संतोष बुधवंत, रामभाऊ जगताप, देवानंद कुटे, प्रभाकर सानप, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.

चारा छावण्या सुरू करा

शेतकऱ्यांसमोर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या, अशी मागणी केली. पिकांसह पशुधनाचेही नुकसान होत असल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत आणि स्वतंत्र दुष्काळी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली.

चारा छावण्या सुरू करा

शेतकऱ्यांसमोर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या, अशी मागणी केली. पिकांसह पशुधनाचेही नुकसान होत असल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत आणि स्वतंत्र दुष्काळी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT