Godavari river flood
पूर्णा: तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे सोन्ना, पिंपळगाव बाळापूर आणि गोळेगाव या गावांच्या शिवारात पुराचे पाणी घुसले असून, शेतजमिनी व घरांची बाजूने पाण्याने वेढा घातला आहे.
मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या व नाले सतत भरत असून जायकवाडी, येलदरी व सिध्देश्वर धरणात पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर्णा व गोदावरी नदीपात्रात पाण्याचा प्रचंड ओघ निर्माण झाला आहे.
अधूनमधून आधीच पिकांनी भरलेले शेत या बॅकवॉटरमुळे पूर्णपणे पाण्यात बुडाले असून शेतकरी चिंतेत आहेत. स्थानिक नागरिक व शेतकरी या परिस्थितीमुळे हवालदील झाले आहेत आणि भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.