परभणी

Reservation : आरक्षण द्या, अन्यथा पतीपासून फारकत घेण्याची परवानगी द्या; मराठवाड्यातील महिलेची मागणी

backup backup

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भातल माहेर,मी ओबीसी आहे पती मात्र मराठा आहेत तेव्हा आता सरकारने आम्हाला आंतरजातीय विवाह केला म्हणून अनुदान द्यावे. अन्यथा,माझ्या कुटुंबाला ओबीसीचे आरक्षण द्यावे अन्यथा आम्हाला पतीपासून फारकत घेण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी आगळीवेगळी मागणी तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामपंचायत सदस्या यांनी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.

तालुक्यातील सावरगाव येथील अर्चना गंगाधर लिखे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, माझे माहेर विदर्भात आहे आम्ही तेथे ओबीसीमध्ये आहोत मराठवाड्यात आल्यानंतर माझ्या पतीची जात ही मराठा होते. हा मुद्दा उचलून धरत आम्हाला सरकारने आता आंतरजातीय विवाह केला म्हणून शासनाकडून मिळणारे अनुदान द्यावे, शिवाय आम्हाला शासनाच्या मिळणाऱ्या सुविधा देखील द्याव्यात अन्यथा मला फारकत घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्चना लिखे या मागील बारा वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवून सावरगाव ग्रामपंचायत सदस्या आहेत विदर्भातील लेकी-सुनांचा हा प्रश्न नक्कीच आता जिल्हा प्रशासन व सरकारला विचार करायला लावणार आहे.

SCROLL FOR NEXT