EPFO  Pudhari Photo
परभणी

Parbhani EPFO News | भविष्य निर्वाह निधी परताव्यासाठी ऑनलाईन ‘बीडीएस’ प्रणाली सुरू करा

Online BDS system updates | राज्य सरचिटणीस किशन पुंड यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत संपूर्ण राज्यातील आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा (PF) परतावा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन ‘बीडीएस’ प्रणाली तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा कार्यकारी सदस्य किशन पुंड यांनी अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय, मुंबई तसेच सचिव, संचालक (पुणे) आणि प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील अनेक अनुदानीत आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या काही वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र ‘बीडीएस’ ऑनलाईन प्रणाली बंद असल्यामुळे त्यांना भविष्य निर्वाह निधीचा परतावा अथवा ना-परतावा लाभ मिळालेला नाही. परिणामी संबंधित कर्मचारी आर्थिक लाभापासून वंचित राहिले असून त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ही बाब अत्यंत क्लेशदायक व निंदनीय असल्याचे संघटनेने म्हटले असून, शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन ‘बीडीएस’ प्रणाली पुन्हा सुरू करून संपूर्ण राज्यातील आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रलंबित लाभ तत्काळ मिळवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT