दुधना नदीत अवैध रेती उत्खनन; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त pudhari photo
परभणी

Dudhna river illegal sand mining : दुधना नदीत अवैध रेती उत्खनन; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बोरी : दुधना नदी पात्रातून विनापरवाना सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात बोरी पोलिसांनी गुरुवारी (दि.१९) सायंकाळी कारवाई करत सुमारे ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दुधनगाव शेतशिवारातील दुधना नदी पात्रात गुरुव ारी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुधीर भोडवे यांच्या शेताजवळ सचिन नागोराव देशमुख (वय ३१, रा. पेडगाव, जि. परभणी) हा ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने बेकायदेशीर रेतीचे उत्खनन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपीस मुद्देमालासह पकडले.

कारवाई दरम्यान सिल्व्हर रंगाचे आयशर कंपनीचे ट्रॅक्टर (इंजिन व चेसिस क्रमांक नमूद, पासिंग क्रमांक नसलेले) तसेच लाल रंगाची रेतीने भरलेली ट्रॉली असा एकूण ६.०६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रॉलीमध्ये सुमारे १ ब्रास रेती असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी पो. ना. अनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. सूर्यवंशी यांनी केली. तपास पोलीस हवालदार कोकाटे हे करीत आहेत. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT