पूर्णा पांगरा येथे जखमी वानरास जीवदान मिळाले  Pudhari
परभणी

पूर्णेच्या पांगरा येथे मोकाट कुत्र्यांचा वानरावर हल्ला, असे मिळाले जीवदान!

पुढारी वृत्तसेवा
आनंद ढोणे

पूर्णा (परभणी) : तालुक्यातील पांगरा लासीना येथे जिल्हा परिषद शाळेजवळ झाडावर बसलेल्या कळपापैकी एक वानर खाली उतरले. त्याला भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवत चावा घेऊन गंभीर जखमी केले. इतक्यात झाडावरील महाळ्या वानर चिडून खाली उतरताच वानरावर हल्ला चढवणारे कुत्रे पळून गेले. तोपर्यंत सदर वानरास कुत्र्यांनी कडाडून चावा घेत वानराच्या पायाची मांडी, छाती फोडून काढत चांगलेच जखमी घायाळ केले. तेथून जाणारे शाळकरी मुले व नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर जखमी वानरास बिस्किट खाऊ घालून पाणी पाजून जीवदान दिले.

दरम्यान, दै. पुढारीचे प्रतिनिधी यांनी देखील ही घटना पाहिलयानंतर प्रथम तहसीलदार माधवराव बोथीकर, सहाय्यक वनाधिकारी निलोफर शेख वनविभाग परभणी, पशूधन विकास अधिकारी चुडावा यांच्याशी संपर्क साधला. संबंधित वनरक्षक शेख, वनविभाग परभणी यांच्या सांगण्यावरुन पशूधन विकास अधिकारी चुडावा यांच्या आदेशानुसार स्थानिक पशूधन वैद्यकास पाठवून त्यांच्याकडून जखमी वानरावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर वनरक्षक कर्मचारी निलोफर शेख परभणी घटनास्थळी येत असल्याचे स्वत: सांगितले. दरम्यान, दुपारी ११:४८ वाजेपर्यंत प्राथमिक उपचारानंतर जखमी वानर शाळेत निपचित अवस्थेत पडून होते.

वनविभागाने लक्ष देणे गरजेचे  

पूर्णा येथे परभणी वनविभाग खात्याचे उपकार्यालय आहे. येथे शासकीय सेवेत असणारे वनरक्षक कर्मचारी कार्यालयात नियमितपणे उपस्थित असणे गरजेचे आहे. जेणेकरून, वन्यप्राण्यांविषयी काही घटना निर्माण झाल्यास त्यांच्याशी तत्काळ संपर्क साधता येईल. वनविभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

वनविभाग परभणीच्या पेट्रोलियम कारने वानरास नेले

दरम्यान, संबंधित जखमी वानराची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन वनविभाग खाते परभणीची पेट्रोलियम कार दुपारी १२:३० वाजता आली. वनरक्षक कर्मचारी निलोफर शेख यांनी इतर वनविभाग कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुढील उपचारार्थ परभणी येथे नेण्यात आले. उपचारानंतर वानर ठिक झाल्यास त्यास वनात सोडून दिले जाईल, असे वनरक्षक कर्मचारी निलोफर शेख यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT