परभणी

Parbhani news | उपगृह पीक पाहणी रिपोर्ट अन् कृषी मंडी आवक अहवालामुळे पीक विमा भरपाईत होणार घट

विमा कंपनीकडे शेतकरी हप्ता आणि राज्य व केंद्र शासनाकडील हिस्सा असा मिळून कोट्यवधी रुपये रक्कम जमा झाली आहे

पुढारी वृत्तसेवा

आनंद ढोणे

पूर्णा : तालुका परिसरातील शेतशिवारात खरीप हंगाम २०२५ मध्य ऑगस्ट - सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकदा नद्या नाल्यांना मोठे पूर येवून माती गाळासह पिके खरडून गेली. त्याचबरोबर उर्वरित क्षेत्रातील देखील सोयाबीन मुग उडिद कापूस ही पिके बाधित झाली.

उत्पादन क्षमता निम्म्याहून अधिक आली. यातच पिकाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण नुकसान भरपाई मिळावी म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सदर पिकांचा ए आय सी पीकविमा कंपनीकडे सि एस सी केंद्राथ्रो पैसे भरुन प्रिमियम भरले.

अतिवृष्टीमुळे उत्पादन क्षमता कमालीची घटल्या गेली. यातच, सोयाबीन पिक उत्पादन क्षमता जाणून घेण्यासाठी उपगृह पिकपाहणी रिपोर्ट फोटो पिक स्थिती, कृषी मंडीतील आवक माहिती गृहीत धरल्यामुळे विमा नुकसान भरपाईत घट होण्याचे संकेत मिळत आहेत. पिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपनीकडे शेतकरी हप्ता आणि राज्य व केंद्र शासनाकडील हिस्सा असा मिळून कोट्यवधी रुपये रक्कम जमा झाली आहे. त्या पैशाचा आजपर्यंत कंपनीने फायदा घेतला. आता एप्रिल महिना अर्धा संपत असतानाही पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.

शासनाने सदरील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम २०२५ मध्य पूर्वीचे नैसर्गिक आपत्ती पावसाचा खंड, अतिवृष्टी,किडरोग प्रादुर्भावाने पिके बाधित हे तक्रार मुद्दे वगळले. त्याऐवजी फक्त पिककापणी उत्पादन आवरेज प्रयोग हा एकच नियम लागू केला. यंदा अतिवृष्टीचं प्रमाण अधिक असल्यामुळे पिक कापणी प्रयोगातून उत्पादन क्षमता अतिशय कमी आली. ह्या येल्ड बेस मुद्यनूसार पिक विमा नुकसान भरपाई चांगल्या रक्कमेत मिळाली असती. मात्र पिक विमा कंपनी आणि शासनाने संयुक्तपणे ऐनवेळी एक नवीन मुद्दा पुढे आणला. जे की, खरीप हंगाम पेरणी काळानंतर पिक कापणी काढणी कालावधीत पावसाचा खंड असो की अतिवृष्टी पुर परिस्थिती या दरम्यान सॅटेलाइट(उपगृह )पिकपाहणी फोटो रिपोर्ट अन् कृषी मंडी बाजारात सोयाबीनची झालेली आवक त्याची उत्पादन क्षमता, त्याचबरोबर नाफेड ने शासकीय हमीदरात किती क्विंटल सोयाबीन खरेदी केले. हा सर्व रिपोर्ट अहवाल माहिती घेवून उत्पादन क्षमता ग्राह्य धरली.तसेच मागील सात वर्षाचे उंबरठा उत्पादन. या सर्व बाबींचा विचार सल्लामसलत हिशोब धरला गेल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांना हेक्टरी अतिशय तुटपुंजी पिक विमा नुकसान भरपाई मिळणार असल्याचे निश्चित होत असल्याचे विश्वसनीय सूत्राचे म्हणणे आहे.

कर्जमाफीच्या घोषणेमुळे पीक विमा भरपाई कमी मिळण्याची शक्यता?

दरम्यान, खरीप हंगाम २०२५ मध्य झालेल्या अतिवृष्टीमुळे खरच पिकं बाधीत होवून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. यातच, अतिवृष्टी काळात मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी १७५०० रुपये पिक विमा नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले होते. परंतु, त्यानंतर महायुती सरकारने शेतकऱ्यांना २ लाखा पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ती माफी जुन महिन्याच्या शेवट पर्यंत देण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीसाठी सरकारला मोठे आर्थिक बचट लागत आहे. त्यामुळे पिक विमा भरपाई थोडी कमी दिली तर चालेल परंतु कर्जमाफी द्यायची आहे. म्हणून देखील पीक विमा नुकसान भरपाई मोठ्या रक्कमेत देण्याचं टाळलं असावं. असं काही जाणकार शेतकरी बोलून दाखवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT