चांदज पाटीजवळ अपघातग्रस्त झालेली बस  Pudhari
परभणी

Parbhani Bus Accident | जिंतूरहून परभणीकडे येत असलेली बस पिकअप व्हॅनला चुकविताना उलटली

चांदज पाटीजवळ घटना, जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

Jintur to Parbhani bus accident

परभणी : जिंतूरहून परभणीकडे येत असलेली बस गुरुवारी (दि. 11) सकाळी चांदज पाटीजवळ अपघातग्रस्त झाली. पिकअप व्हॅनला धडक होऊ नये म्हणून चालकाने बस वळवली असता ती रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यात अपघात काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना मदत केली. जिंतूर येथून निघालेली एमएच-14 एमएच-1959 ही बस परभणीकडे जात असताना हा प्रसंग घडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT