बोरी ः खंजरसह पकडलेल्या आरोपींसमवेत बोरी ठाण्यातील पोलिस. pudhari photo
परभणी

Parbhani Crime : हातात खंजर घेऊन फिरणाऱ्या चौघांना पोलिसांनी केले जेरबंद

एकूण 1 लाख 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

बोरी : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेक येथे रविवारी (दि.3) सायंकाळी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात लोखंडी खंजर घेऊन फिरणाऱ्या चौघा आरोपींना बोरी पोलिसांनी तातडीने साखळी पध्दतीने कारवाई करत जेरबंद केले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन केशवराव खिल्लारे (रा.शेक, ता.जिंतूर), सिध्दार्थ सुरेश पंडित (रा.मांडवा, ता.परभणी), तसेच राहुल कैलास वाव्हळे व श्रीकांत अशोक कठाळे (दोन्ही रा.टाकळी कुंभकर्ण, ता.परभणी) हे चौघे एकत्र येऊन गावात दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत होते. त्यांच्या हातात धारदार लोखंडी खंजर असल्याची माहिती मिळताच बोरी पोलिसांनी तत्काळ धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे.

ही घटना रविवारी (दि.3) सायंकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 500 रुपयांचा खंजीर तसेच अंदाजे 1 लाख 50 हजार रुपयांचा बजाज कंपनीचा ऑटो क्र.एमएच 22 एपी 4089 असा एकूण 1 लाख 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश मोरे यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत. सर्व आरोपींना अटक करून न्यायालयीन कारवाईसाठी हजर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT