Objectionable Post On Minister
जिंतूर : परभणी जिल्हाच्या पालकमंत्री सौ मेघना दिदि बोर्डीकर यांच्या विरुद्ध शोशल मिडीयावर वारंवार जिंतूर येथील विष्णु नागरे हा सतत फेसबुक अकांऊट वरून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या बद्दल अपमानास्पद व बदनामीकारक तसेच आक्षेपार्ह पोष्ट करीत असतो.
त्याने केलेली पोष्ट ही फेसबुक व इतर समाज माध्यमावंर उपलब्ध आहे असे चुकीचे व बिनबुडाचे खोटे संदेश पसरवनारा विष्णू नागरे या व्यक्तीवर आय टी सेल कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल करून त्वरीत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी म्हणून जिंतूर येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन जिंतूर येथे आज दिनांक २८ जुलै सोमवारी निवेदन दिले आहे.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष गोविंद थिटे, खेत्रे आबा, बाबाराव आंधळे, एड सुनिल मते, शिवाजी कदम, गोपाळ रोकडे, संदीप घुगे, शिवाजी काळे, शेख मतीन तांबोळी, सुयोग ज्ञानोबा मुंढे, दत्ता काळे, भाकरे गणेश, भास्कर थिटे, अशोक बुधवंत, सचिन आडे, दत्ता कटारे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या केल्या आहे.