An average of 71 percent voting was recorded for the mini-ministry
परभणी, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्णा ५४ गट व पंचायत समितीच्या १०८ गणांसाठी शनिवारी (दि.७) सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अंदाजे ७१ टक्के मतदान झाले, जिल्हा परिषदेच्या २४७ तर पंचायत समितीच्या ४३३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
शनिवारी सकाळी ७.३० वाजेस मतदानास प्रारंभ झाल्यानंतर सुरूवातीच्या दोन तासांत मतांची टक्केवारी केवळ ८.९२ टक्के होती. सकाळी मतदान प्रक्रिया संथपणे पार पदा असताना दुपारनंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे दिसून आले.
दुपारी ३.३० वाजेपर्यंत जितूर तालुक्यात ५४ हजार ४७८ पुरुष तर ५५ हजार ३२५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मताची टक्केवारी ५४.३८ टक्के होती. परभणी तालुक्यात ५४ हजार १३० पुरुष तर ५५ हजार ६१९ महिला मतदारांनी हक्क बजावला. मताची टक्केवारी ५७.४४ होती. मानवत तालुक्यात १८ हजार ७९३ पुरूष तर १९ हजार ६३१ महिला मतदारांनी हक्क बजावला. मतांची टक्केवारी ५४.३७ टक्के होती. सेलू तालुक्यात २९ हजार ४३५ पुरूष तर ३० हजार २६९ महिला मतदारांनी हक्क बजावला. मर्ताची टक्केवारी ५८.३२ टक्के होती. पाथरी तालुक्यात २४ हजार १९ पुरूष तर २४ हजार ४३८ महिला मतदारांनी हक्क बजावला. मतांची टक्केवारी ५५.८१ टक्के होती. सोनपेठ तालुक्यात १६ हजार १७३ पुरूष तर १६ हजार १३४ महिला मतदारांनी हक्क बजावला. मतांची टक्केवारी ५३.०८ टक्के होती. पूर्णा तालुक्यात ३५ हजार १८० पुरूष तर ३४ हजार ५७० महिला मतदारांनी हक्क बजावला, मतांची टक्केवारी ५६.८९ टक्के होती.
पालम तालुक्यात २३ हजार २८७ पुरूष तर २४ हजार १६५ महिला मतदारांनी हक्क बजावला. मतांची टक्केवारी ५५.९२ टक्के होती. गंगाखेड तालुक्यात ३३ हजार १०२ पुरूष तर ३३ हजार ८६२ महिला मतदारांनी हक्क बजावला. मतांची टक्केवारी ५३.७४ टक्के होती. सायंकाळी ५.३० वाजेनंतरही जिल्हाभरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. झरी येथे ८०.१३ टक्के मतदान शांततेत पार पडले. येथील लढतीकडे जिल्हयाचे लक्ष लागले असून भाजपाचे दिलीपराव देशमुख तर उबाठा शिवसेनेच्या सोनल देशमुख यांच्यात येथे तुल्यबळ लढत झाली आहे. राणीसावरगाव येथे ७१.२९ हक्के मतदान झाले. येथे तुरळक ठिकाणी वादाचे प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. याठिकाणी एकुण ८१८४ पैकी ५८३५ मतदारांनी आपला हक्क बजावला. सायकांळी साडेपाच वाजेनंतरही रांगा असल्याने मतदान प्रक्रि या सुरू होती. ताडकळस येथे ६६.६८ टक्के मतदान झाले.
बोरीत ७०.०४ टक्के शांततेत मतदान
जिल्हयाचे लक्ष लागलेल्या येथील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शनिवारी ७०.०४ टक्के सरासरी मतदान झाले. यात १२ हजार ३० पैकी एकूण ८ हजार ४८० मतदारांनी हक्क बजावला. पुरुष ४ हजार ५३ तर महिला ४ हजार ४२७ समावेश होता. ५.३० वाजेपर्यंत जिल्हा परिषद केंद्रावर महिला व पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या, जिल्हा परिषद शाळेत १७ मतदान केंद्र होते तर बोरी तांडा येथे १ मतदान केंद्र असे एकूण १४ केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. जिल्हा परिषद केंद्रावर झोनल अधिकारी भूषण पवार यांनी काम पाहिले, उसेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधिक्षक गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी बेनेवाल, बोरीचे सपोनि धोंडगे, उपनिरीक्षक गायकवाड, जमादार दिलावर, कर्मचारी बटाळ, शेख रफिक यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बंदोवस्त तैनात केला होता. दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दिपाली चौधरी यांनी निवडणूक आयोगाकडे काही मतदारांकडे योग्य कागदपत्रे असतानाही मतदानापासून खोली क्र. ४ मधील केंद्रावरील केंद्राध्यक्षा विरोमात मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप नोंदवला. यावेळी एक मतदानापासून वंचित राहिलेला उपस्थित होता.
लग्नाआधी नववधुने बजावला मतदान हक्क
जिंतूर: लोकशाहीच्या उत्सवात सहभागाला प्राधान्य देत विवाह सोहळ्यापूर्वी मतदान करून बोडी (ता. जिंतूर) येथील नववधूने नागरिकत्वाचा आदर्श कर्तव्यगाव जपला आहे. बोर्डी येथील आकांक्षा मधुकर कदम आणि पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील संग्राम देसाई यांचा शनिवारी विवाह झाला. मात्र लग्राच्या आधी आकांक्षा कदम यांनी बोडर्डी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदान हक्क बजावला. लप्रापेक्षा मतदान अधिक महत्त्वाचे असा संदेश देत त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या या निर्णयाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असा संदेश या नवविवाहित दाम्पत्याने दिला आहे.
४६६ मतदार, एकही मत नाही; बोथ, बोथ तांड्यावरील ग्रामस्थांचा शंभर टक्के बहिष्कार चारठाणा: सेलू तालुक्यातील बोष व बोथ तांडा येथील ग्रामस्थांनी गावात रस्ता व पूल होईपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान न करण्याचा ठाम निर्णय घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर शंभर टक्के बहिष्कार टाकला. या मतदान केंद्रावर एकूण ४६६ मतदार असतानाही एकही मत नोंदले गेले नसून 'झिरो मतदान' झाल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतरही बोध ज बोथ तांडा गाय मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला, गावाला जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता व पूल नसल्यामुळे पावसाळ्यात संपर्क पूर्णपणे तुटतो. आरोग्य सेवा, शिक्षण, शेतीमालाची वाहतूक गासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र आजपर्यंत प्रशासन व राजकीय प्रतिनिधींनी केवळ आश्वासने दिली, प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शनिवारी (दि. ७) सकाळी वोथ येथील मतदान केंद्रावर सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर व गटविकास अधिकारी उदयंत जाधव यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रस्ता व पूल बांधकामाबाबत वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले. मात्र ग्रामस्थांनी हे आश्वासन फेटाळून लावत, आम्हाला आता शब्द नकोत, प्रत्यक्ष रस्ता व पूल पूर्ण झालेला पाहिजे. तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सचिन राठोड यांनी प्रशासनासमोर भूमिका मांडताना आमच्याकडून दरवेळी मतदान करून घेतले जाते, पण गावाच्या विकासाकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आता आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मतदान न करण्याची शपथ घेतली. बोध व बोध तांडा येथील मतदान केंद्रावर दिवसभर एकही मतदार फिरकला नसल्याची माहिती मतदान केंद्राध्यक्ष गजानन चव्हाण यांनी दिली. ४६६ मतदार असूनही एकही मत नोंदले न गेल्याने प्रशासनातही खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या या आंदोलनात्मक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रशासन व लोकप्रतिनिधींची जबाबदारी ऐरणीवर आली असून, रस्ता व पूल कामाबाबत ठोस निर्णय केव्हा घेतला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
सोनुळ्यात बोगस मतदानाचा आरोप, आंबेगावात पुराव्याविना मतदानाचा प्रयत्न मानवत : तालुक्यातील सोनूजा व आंबेगाव येथे काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली. रामपुरी गट व मंगरूळा गगातील सोनूका मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप मतदान प्रतिनिधी दादासाहेब भोरकडे यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी छाया राजूभाऊ शेळके या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने मतदान केले. ही बाघ केंद्रावरील अधिकारी व कर्मचायांच्या निदर्शनास आणून देऊनही योग्य कारवाई झाली नाही.
यासाठी जबाबदार धरून रामपुरी गटातील उमेदवार गीतांजली दत्तात्रय जाधव ज मंगरूळ गणातील उमेदवार शहानुरखा पठाण यांची उमेदवारी रद्द करावी, तसेच दोन्हीं उमेदवारांसह त्यांचे प्रतिनिधी बालासाहेव माणिकराव भोरकडे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. आंबेगाव येथे काही मतदारांनी आवश्यक ओळख पुरावा नसतानाही मतदान करण्याचा आग्रह धरला मतदान अधिकायांनी नियमांनुसार नकार दिल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत मतदान प्रक्रिया सुरू केली.