मृत शेतकरी  Pudhari Photo
परभणी

नांदगावात नापीकीला कंटाळून शेतकरी युवकाने संपवले जीवन

Parbhani News | प्रेताची सुटली होती दुर्गंधी

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: परभणी तालूका व पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदगाव येथे एका ३५ वर्षिय युवकांने आपले जीवन संपवले आहे. या शेतकऱ्याने नापीकीला कंटाळून छताच्या आडूला गळफास घेतला. विजय मंचकराव भालेराव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे विजय मंचकराव भालेराव (वय ३५ वर्ष) यांनी त्यांच्या शेतीत सतत होणारी नापीकी यामुळे कर्जबाजारी होऊन गळफास लावून घेतला. ही घटना पूर्णा ठाण्यात नुकतीच नोंद झाली आहे. १० एप्रिल गुरुवार रोजी घडली असून दोन दिवस याचा पत्ता लागला नव्हता. दरम्यान एका बंद खोलीतून दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळे दरवाजा मोडून पाहीले असता. सडलेल्‍या अवस्थेत युवक शेतकऱ्याचा मृतदेह छताच्या आडूला गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पुढील तपास जमादार श्याम काळे‌ करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT