गंगापूर उपविभागामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे गांवाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ Pudhari Photo
परभणी

परभणी : गंगाखेड उपविभागातील ३५ गावे सीसीटीव्हीच्या 'नजरकैदेत'

डीवायएसपी डॉ.टीपरसेंचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : प्रमोद साळवे

गंगाखेड पोलीस उपविभागातील गुन्हेगारी कमी करण्याच्या उद्दिष्टाने आणि सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम उपविभागीय अधिकारी डॉ.दिलीप टीपरसे यांच्या पुढाकारातून प्रत्यक्षात आला. गंगाखेड, सोनपेठ व पिंपळदरी पोलीस ठाणे अंतर्गतच्या कार्यक्षेत्रातील तब्बल ३५ गावच्या ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, पुढार्‍यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी ३५ गावांतील गुन्हेगारी, चोरी, घरफोडी आदींसारख्या गुन्ह्यांत लक्षणीय घट होणार आहे.

उपविभागातील पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यान्वित केलेले गावः

  • गंगाखेड पोलिस स्टेशन अंतर्गत : मसला, रूमना (ज), अकोली, खरबडा, बामनी, झोला, जवळा (रु), भेंडेवाडी, वैतागवाडी, धनेवाडी, मालेवाडी, धनगर मोहा, भुजबळ सावंगी, पडेगाव, वडगाव, रोकडेवाडी, वझुर, देवठाना.

  • सोनपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत : महातपुरी, सखाराम तांडा, तिवठाणा, वाणी संगम, आनंदवाडी, दहिखेड, शेळगाव (मराठा), शेळगाव (हटकर), उखळी बुद्रुक, नरवाडी, देवी नगर, खडका.

  • पिंपळदरी पोलिस स्टेशन अंतर्गत : राणीसावरगाव, मर्डसगाव, मार्तंड वाडी, ढेबेवाडी, सुपा, पांढरगाव, गुंजेगाव.

गंगाखेड पोलीस उपविभागातील गुन्हेगारी संपूर्णपणे रोखण्यासाठी लोकसहभाग लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची संकल्पना डीवायएसपी डॉ.टिपरसे यांनी मांडली. मोहिम यशस्वी करण्यासाठी गंगाखेडचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, सोनपेठचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, पिंपळदरीचे प्रभारी दिनेश सूर्यवंशी, उपविभागातील सर्व अधिकारी अंमलदार, लोकप्रतिनिधी ,व्यापारी प्रतिष्ठित नागरिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे गावातील पोलीस पाटील यांनी ही योजना राबवण्यासाठी मेहनत घेतली आहे.

सुरक्षेला प्राधान्य मिळणार : डॉ.दिलीप टिपरसे, डीवायएसपी

सीसीटीव्ही बसवण्याच्या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होऊन गावांमध्ये सुरक्षेला प्राधान्य द्यावी. गावच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः लोक सहभाग व ग्रामपंचायतीने घेतल्याने गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. या कामी सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व्यापारी पुढारी व सामाजिक संस्थांचे आभार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT