वयाच्या १३ व्या वर्षी निशिगंधाकडून कळसुबाई शिखर सर File Photo
परभणी

वयाच्या १३ व्या वर्षी निशिगंधाकडून कळसुबाई शिखर सर

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : प्रमोद साळवे

शहरातील निशिगंधा नितीन मस्के हिने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात कळसुबाई शिखर सर करण्याची धाडसी किमया तिने साधली आहे.

शहरातील वेदांत विद्यामंदिरात इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या निशिगंधा नितीन मस्के हिने पंचायत समितीच्या माजी उपसभापती मंजुषा जामगे यांच्या प्रेरणेतून दि.२९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता १६४६ मीटर उंच ( ५४०० फुट) असलेले कळसुबाई शिखर सर केले.

अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून आपल्या कुटुंबाची देखभाल करणाऱ्या वडील नितीन व आई रेखा यांच्या निशिगंधा या कन्येच्या धाडसी उपक्रमाला पंचायत समितीच्या माजी उपसभापती मंजुषा जामगे यांनी मोलाचा हातभार लावला. निशिगंधा हिच्या या धाडसी कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT