परभणी

परभणी : गंगाखेडमध्ये १० भाविकांना भगरीतून विषबाधा

दिनेश चोरगे

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : भागवत एकादशी निमित्त उपवास करणाऱ्या तालुक्यातील मुळी व सुरळवाडी येथील १० भाविकांना भगरीतून विषबाधा झाली. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि.७) ही घटना घडली. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरापासून ते शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान दर्शन या भगर निर्मिती कंपनीवर मुळी येथील भाविकांनी आक्षेप नोंदवला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भागवत एकादशी निमित्त तालुक्यातील मुळी व सुरळवाडी येथील काही भाविकांना भगरीच्या सेवनामुळे गुरुवारी संध्याकाळी  डोके दुखणे, पोटात मळमळ होणे, उलटी होणे आदी प्रकार सुरू झाले. त्यानंतर भाविकांना तात्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा उपचारासाठी दाखल करण्यात आले. दाखल झालेल्या सर्व रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उपचार करून शुक्रवारी (दि.८) दुपारी त्यांना घरी सोडले. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये पुजा अशोक भोसले (वय ३०) अनुरध शेषेराव भोसले (वय ५५) सत्यशिला भोसले (वय ४५) शिवाजी भोसले (वय २५), प्रतिक्षा शिवाजी भोसले (वय २०), आशोक भोसले (वय २५) रा.सर्व मुळी, सुमित्रा भालचंद पांचाळ (वय ४०), अनिकेत पांचाळ (वय १६), कविता पांचळ (वय १८), आंगद माणिकराव शेवाळे रा.सर्व सुरळवाडी यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT