मराठवाडा

परभणी : नाम नदीवरील पर्यायी पूल खचला

backup backup

परभणी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील झरी येथील नाम नदीवर पुलाचे काम सुरु आहे. यामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी पुलावर पाणी आल्यामुळे तो खचल्याने जिंतूर ते परभणी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. जेसीबीच्या साह्याने मुरूम टाकून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाकडून केला जात आहे. झरी परिसरात शनिवारी ढगफुटी सदृश पाऊस पडला. यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले तसेच जवळच असलेली नाम नदीजवळ असलेली नर्सरीसह आनंदनगर भागातील घरामध्ये पाणी शिरले असून, नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली तर झरी व परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे जिंतूर ते परभणी रोडवर केलेल्या पर्याय पुलावर पाणी आल्यामुळे जिंतूर परभणी रोडवर सर्व वाहतूक ठप्प झाली. तसेच आनंद नगरच्या सकल भागातील घरामध्ये पाणी घुसल्यामुळे अनेकांना याचा फटका बसला.

याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे झरी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 2005 ची पुनरावृत्ती होती की काय? असा प्रश्न पडला आहे. जिंतूर ते परभणी रोडवर वाहतूक ठप्प झाल्यानंतर सदरील कामावर फक्त एक जेसीपी उशिरा दाखल झाली व मुरूम टाकून रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला होता.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT