मराठवाडा

हिंगोली : वाटसरूची तहान भागवणारी पाणपोई आठवणीतचं राहणार

दिनेश चोरगे

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा :  उन्हाळा सुरू झाला की विविध पक्षातील राजकीय मंडळी व स्वयंसेवी संस्थांकडून ठिकठिकाणी पाणपोईचे नियोजन करण्यात येत असते. परंतु आता कडक उन्हाची तीव्रता भासूनही थंडगार पाण्याचे माठ किंवा रांजण आता दिसायचे बंद झाले आहेत. त्यामुळे थंडगार पाण्याची पाणपोई आठवणीत जमा झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.

राज्यात शहरी भागासह ग्रामीण भागातील बसस्थानक परिसर, विविध चौक, दुकाने, बॅंका , शाळा, महाविद्यालये अदि ठिकाणी कडक उन्हाळ्यात वाटसरूची तहान भागावी, यासाठी पाणपोई असायची. मार्च ते मे सलग तीन महिने ठिकठिकाणी बांबुचे ताटवे मंडप उभारून कुंभाराकडून माठ विकत आणून काही स्वयंसेवी संस्थांकडून वाटसरूंसाठी पाणपोईची व्यवस्था केली जात असे. ही पाणपोई बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात ठेवली जात असे. उन्हातून येणाऱ्या वाटसरूसांठी या पाणपोईचा आधार होता. मात्र सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातही या पाणपोईचं दिसणं बंद झालं आहे. उन्हाळ्यात कोरड पडलेल्या वाटसरूच्या घशास थंडगार पाणी देण्यारी पाणपोई आठवणीतचं राहिल्‍याचे पाहावयास मिळत आहे.

  हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT