मराठवाडा

पैठण : नाथसागर धरणातून गोदावरी नदीत ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

backup backup

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणातून आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यासाठी गोदावरी नदीत शनिवारी (दि. १७) ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी दिली. सध्या नाथसागर धरणामध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ७६.८८ उपयुक्त पाणीसाठा होता परंतु आज रोजी या धरणात एकूण ३१.२८ पाण्याचा साठा शिल्लक आहे.

आपेगाव हिरडपुरी परिसरातील गोदावरी नदी लगत असलेल्या व बंधाऱ्याच्या पाण्यावर आधारित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे.या परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे धरणातून बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. नाथसागर धरण कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी धरणातून टप्प्याटप्प्याने ५०० क्युसेक शनिवारी दि.१७ रोजी सांडव्याच्या द्वार क्र१८व१९ मधून आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला. नाथसागर धरणात दि.१ जून २०२३ पासून आत्तापर्यंत वरील धरणातून ८७६.८९६७ दलघमी पाण्याची एकूण आवक झालेले असून. शनिवारी सायंकाळी धरण नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार धरणाची पाणी पातळी १५०६.३१ फुटामध्ये आहे.

SCROLL FOR NEXT