मराठवाडा

उस्मानाबाद : ज्योत आणण्यासाठी जाताना उपसरपंच, आरोग्य सेवकाचा अपघातात मृत्यू

अविनाश सुतार

रत्नापूर; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील २ तरुणाचा तुळजापूर येथे ज्योत आणण्यासाठी जात असताना अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १० वाजता रत्नापूर येथे महामार्गावर घडली. उपसरपंच अमोल सुरेशराव खिलारे (वय ३८), आरोग्य सेवक महेश भास्करराव भोसले (वय ३१) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.

शनिवारी रात्री सांगावी पाटण येथून तुळजापूरला पायी ज्योत आणण्यासाठी मोटासायकल वरून अमोल खिलारे आणि महेश भोसले जात होते. यावेळी रत्नापूर येथील महामार्गावर त्यांच्या दुचाकीता अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अंत्यविधी आज सकाळी सांगवी पाटण येथे करण्यात आले. या घटनेमुळे सांगावी पाटण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT