सिंदगी घाटात पिकअप टेम्पो उलटून एकाचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी File Photo
मराठवाडा

सिंदगी घाटात पिकअप टेम्पो उलटून एकाचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी

जखमींना उपजिल्‍हा रूग्‍णालयात केले दाखल

पुढारी वृत्तसेवा

वसमत : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सिंदगी घाट येथून वसमतकडे भुसा घेऊन येणारा पिकअप टेम्पो सिंदगी घाटात उलटला. आज (बुधवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. यात पिकअप टेम्पोमधील एकजण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उगम फाटा ते आसेगाव मार्गावरील सिंदगी घाटात आज सकाळी, सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान वसमतकडे भुसा घेऊन जाणारा पिकअप टेम्पो (क्र एम एच २९ एम १४३२) उलटला. या अपघातात पिकअप टेम्पोमधील पळसगाव येथील (२८ वर्षीय) इसमाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे पिकअप टेम्पोबाहेर रस्ताच्या कडेला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

बाळू हिरामण भुतकर (वय ३०), पवन नागोराव खारोडे (२३. दोघे रा मुरुंबा) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि रामदास निरदोडे, बालाजी जोगदंड, संतोष पटवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT