अनैतिक संबंधातून मुंबई पोलिसाकडून खून file photo
नांदेड

Nanded Crime : अनैतिक संबंधातून घरातून उचलून नेऊन तरुणाचा खून

पोलिसांनी आठ आरोपींना केली अटक; थडीसावळी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः बिलोली तालुक्यातील थडीसावळी येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका 22 वर्षीय तरुणाचा अपहरण करून वायर, लाथाबुक्क्यांनी बेदम मारून खून केला. या प्रकरणी आठ जणांविरोधात रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता. त्यांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील थडीसावळी येथील गंगासिंग हनुमानसिंग ठाकूर, राजू गंगासिंग ठाकूर, हनुमानसिंग गंगासिंग ठाकूर, पद्मसिंग गंगासिंग ठाकूर, दिलीपसिंग ठाकूर, विजयसिंग ठाकूर, विशालसिंग ठाकूर, प्रतापसिंग ठाकूर प्रतापसिंग ठाकूर या आठ जणांनी मिळून नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्याच नात्यात असलेल्या दुर्गेशसिंग दारासिंग ठाकूर वय 22 रा. मुतन्याळ याला घरासमोरून उचलून थडीसावळी येथे नेऊन वायर व लाथाबुक्क्यांनी गुप्तागांवर बेदम मारहाण केली . या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी रवींद्रसिंग हनुमानसिंग ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आठ जणांविरोधात रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आठही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना बिलोलीच्या न्यायालयासमोर हजर केले असता. न्यायालयाने आठही जणांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विक्रम हराळे हे करीत आहेत.

आरोपीला 24 तासांत अटक

आरोपींनी दुर्गेशसिंग ठाकूर याला मुतन्याळ या गावातून त्याचे अपहरण करून थडीसावळी येथे नेले व तुला वांरवार सांगूनही तू आमच्याकडे का येतोस त्या महिलेचा तुझा काय संबंध म्हणून वायर आणि लाथाबुक्क्यांनी, गुप्तागांवर एवढं मारलं की त्याचा जागीच मृत्यू झाला.त्याचे अंग काळेनिळे पडले होते. घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलिसांनी फरार झालेल्या आरोपींना 24 तासांत अटक केली.विशेष म्हणजे मानणारे आणि ज्याचा खून झाला ते सर्वजण नात्यातील आहेत.

सहा दिवसांची पोलिस कोठडी

महिलेशी अनैतिक संबंधाचा राग अनावर झाल्याने आठ आरोपींनी दुर्गेशसिंग ठाकूरने रागाच्या भरात प्लान करून खून केला.या आरोपींना बिलोली न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.यात आणखी कुणी आरोपी आहे का याचाही शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT