तुमच्या लेकरांचं चांगभलं, आमच्या लेकरांचं काय ? file photo
नांदेड

तुमच्या लेकरांचं चांगभलं, आमच्या लेकरांचं काय ?

पुढारी वृत्तसेवा
विठ्ठल फुलारी

भोकर : भोकर विधानसभा असो या नांदेड लोकसभा मतदारसंघ जे राजकीय पुढारी आमदार, खासदार इाले, काही मंत्री तर मुख्यमंत्री ही झाले यांनी आपापल्या मुलांना उच्चशिक्षित करून भलं केलं, राजकीय पटलावर आणून त्याची जडणघडण व्यवस्थित केली. पण ज्यांनी तुमच्या साठी मतदान केले, सतरंज्या उचलल्या त्यांच्या लेकरांचे मात्र वाटोळे झाले असल्याचे चित्र भोकर तालुक्यात दिसून येत आहे. ना पश्चिम महाराष्ट्रासारखी शेती फुलली, ना व्यावसायिक शिक्षणाची सोय झाली. ना उद्योगधंदे उभे राहिले.

भोकर तालुक्यातील राजकीय वाटचाल उज्वल आहे. तालुक्याच्या राजकीय घडामोडीकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून असते. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले के शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री ते केंद्रीय गृहमंत्री पदे भूषविले. अशोकराव चव्हाण यांनी दोन वेळा मुख्यमंत्री व इतर मंत्री पदावर विराजमान झाले, डॉ. माधवराव किन्हाळकर हे राज्याचे गृहराज्यमंत्री पदी होते. तरी या मंडळींनी भोकर तालुक्यातील शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले नाहीत, मोठ्या प्रमाणात सिंचन व्यवस्था केली नाही. किंवा उद्य ोगधंदे उभारले नाहीत. ही एक शोकांतिका आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या तालुक्यात वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षणाची सोय केली. मुबलक प्रमाणात शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. उद्योगधंदे उभारले यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व कमी खर्चात शिक्षण उपलब्ध झाले. शेती सुजलाम् सुफलाम् झाली. उद्योगधंद्यामुळे रोजगार उपलब्ध झाला, तरुणांच्या हाताला काम मिळाले.

काही राजकीय मंडळी आपल्या पाल्यांना राजकारणात शटल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मागील तीन महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू आहे, कदाचित ते यात यशस्वी ही होतील. पण सर्वसामान्य माणसाच्या लेकराचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर तुमच्या लेकराला आमदार करायची इच्छा असेल तर आमच्या लेकराला जगता येईल तेवढद्या तरी सुविधा उपलब्ध करून द्यावे लागते.

तालुक्यात छोटे छोटे तलाव उभे करून शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे लागते, उच्च व तंत्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षणाची सोय करून द्यावी लागेल. जेणेकरून आमचं पोरं घरचं खाऊन उच्चशिक्षण घेऊ शकेल. मजुरांच्या हाताला काम नाही याचा विचार करून उद्योगधंदे उभे करावे लागतील.

भोकर तालुक्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता सर्वसामान्यांच्या लेकराचे भलं होईल अशी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. यामुळे तरणाचा वेळ केवळ मोवाईलवर बोर्ट फिरविण्यात जात आहे. राजकीय पुढाऱ्यांनी या बाबीचा विचार करून येथील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हुशार विद्यार्थी बाहेरगावी

भोकर येथे स्वा. सै. कै. भुजंगराव पाटील किन्हाळकर व माजी आमदार कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या यामुळे शाहू महाराज विद्यालय व दिगंबरराव बिंदू महाविद्यालय हे उभे राहिले. या व्यतिरिक्त कृषी विद्यालय व आयटीआय आहे, पण त्यानंतर मात्र विद्वान नेते मात्र अन्य व्यावसायिक शिक्षण आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यामुळे तालुक्यातील हुशार विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी राहातात.

सिंचनाच्या बाबतीत आम्ही भिकारीच

भोकर तालुका सिंचनाच्या बाबतीत अजूनही भिकारीच राहिला आहे. केवळ ११.८२ टक्के शेती सिंचनाखाली येत असून ८८.१८ टक्के कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून पिपळळब साठवण तलाव व सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याचे काम मार्गी लागत असले तरी वामुळे फार मोठी सिंचन व्यवस्था उपलब्ध होणार नाही. तालुक्यातील शंभर टके शेती सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयान करणे आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT