Ashadhi Ekadashi : सिडकोतील कुसुमताई शाळेच्या वृक्षदिंडीने वेधले लक्ष  file photo
नांदेड

Ashadhi Ekadashi : सिडकोतील कुसुमताई शाळेच्या वृक्षदिंडीने वेधले लक्ष

आषाढी एकादशीनिमित्त 'एक पेड, माँ के नाम' अंतर्गत उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

Tree procession by Kusumtai School in CIDCO draws attention

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमीत्त सिडको येथील कुसुमताई विद्यालयाच्यावतीने शनिवारी (दि.२५) वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीत शिक्षक, शिक्षिकांसह विद्यार्थिनींनी पारंपरिक मराठमोळा पेहराव करून सहभाग घेतला. सिडको भागातून निघालेल्या दिंडीमध्ये विठू नामाचा जयघोष करण्यात आला.

शैक्षणिक गुणवत्तेच्या परंपरेसाठी नवीन नांदेडमध्ये ओळखली जाणारी सिडको, संभाजी चौकातील कुसुमताई माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (दि.२५) वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रारंभी, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव संभाजी बिरादार, मुख्याध्यापिका शशिकला बिरादार यांच्या हस्ते पालखीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डोक्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती व रोपटे घेऊन वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली.

वृक्षदिंडी व पालखीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शशिकला बिरादार, पर्यवेक्षिका उज्ज्वला सावते, शेख निजाम गवंडगावकर, विश्वास हंबर्डे, सूर्यकांत वडजे, नरसिंग यलमलवाड, युवराज शिंदे, सतीश जाधव यांच्यासह गंगाप्रसाद पाटील, माधुरी माळगे, वंदना सोनाळे यांनी परिश्रम घेतले.

जयघोषाने परिसर दुमदुमला

विद्यालयातून निघालेली वृक्षदिंडी सिडको परिसरात फिरविण्यात आली. या दरम्यान, विठ्ठला-विठ्ठला, हरिओम विठ्ठलाचा गजर करण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका व नागरिकांनी विठ्ठलाचा एकच जयघोष केल्याने सिडकोचा परिसर दुमदुमून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT