ट्रॅक्टर आणि कारची समोरासमोर धडक, शेतकी अधिकाऱ्याचा मृत्यू pudhari photo
नांदेड

Nanded accident : ट्रॅक्टर आणि कारची समोरासमोर धडक, शेतकी अधिकाऱ्याचा मृत्यू

उमरी तालुक्यातील गोळेगाव ते निमटेक रस्त्यावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

उमरी ः ट्रॅक्टर आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात व्हीपीके उद्योग समूहातील एमव्हीके कारखान्याचे शेतकी अधिकारी प्रकाश मारोतराव पवार (वय 56 वर्ष रा. हंगिरगा ता. उमरी) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उमरी तालुक्यातील गोळेगाव ते निमटेक रस्त्यावर घडली आहे. व्हीपीके उद्योग समूहातील साखर कारखान्यातील शेतकी अधिकारी प्रकाश पवार हे वाघलवाडा कारखान्यावरील आपली ड्युटी संपवून कार ने उमरीकडे येत होते.

दरम्यान समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या धडकेत प्रकाश पवार हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना तत्काळ उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉ. नितीन कुऱ्हे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.घटनास्थळावर पोलीस आणि परिसरातील असंख्य शेतकरी, नागरिकांनी धाव घेतली. हा अपघात भयानक होता. मोठा आवाज झाला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

दरम्यान अपघातानंतर ट्रॅक्टर चालक हा फरार झाला. पुढील कारवाई उमरी पोलिस करीत आहेत.शेतकी अधिकारी प्रकाश पवार यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी उमरी तालुक्यातील हंगिरगा या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुलाचाही अपघातात मृत्यू झाला होता

काही वर्षापूर्वी शेतकी अधिकारी प्रकाश पवार यांच्या इंजीनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलाचाही रस्ता अपघातातच मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचाही अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT