नांदेड : धर्माबाद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुरु असलेल्या तिर्रट नावाच्या जुगारावर महेश रमेश मासुलवार यांनी धाड टाकून रोख दोन हजार ५९० रुपये आणि साहित्य जप्त करून धर्माबाद पोलिसांत गुन्हा नोंदवला.
तसेच अरविंद विठ्ठल हैबतकर यांनी व्यंकटेशनगर उमरी येथे झन्नामन्ना जुगारावर छापा टाकून रोख दोन हजार ५२० रुपये जप्त करून उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
याशिवाय सपोउपनि गणपत नागोराव गिते यांनीही शेवडी (ता. लोहा) येथे मिलन नावाच्या जुगारावर छापा टाकून रोख तीन हजार ३८० व १० हजार रुपयांचे मोबाईल जप्त करून, सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.