दोन बँकांचे एटीएम फोडणाऱ्यास अटक File Photo
नांदेड

दोन बँकांचे एटीएम फोडणाऱ्यास अटक

नांदेडमध्ये 'एलसीबी'ची कारवाई : एक लाखाचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

The person who broke into two bank ATMs has been arrested

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहरातील शुक्रवारच्या मध्यरात्री तरोडा नाका भागातील पंजाब नॅशनल बँक व कोटक महिंद्रा बँकेचे असे दोन एटीएम फोडून आतील रक्कम - चोरण्याचा प्रयत्न झाला. नांदेडच्या - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील एटीएम फोडताना चोराला - रंगेहात पकडले. त्याच्याकडून एक - लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल - करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तरोडा नाका भागात - स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे हे सहकार्यासह गस्तीवर असताना - शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता पंजाब - नॅशनल बँकेच्या एटीएम फोडत असल्याचे निर्दशनास आले पोलिसांनी एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राम मोहन कुरे (वय २६) रा. गागलेगाव ता. बिलोली यास ताब्यात घेत चौकशी केली असता. कुरे याने आपण कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडल्याचे ही कबुली दिली.

दरम्यान, कुरे याला दोन्ही एटीएम मधून पैसे काढता आला नाही. या प्रकरणी पोलिसांनी दुचाकी व साहित्य असा एक लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलिस जमादार रविशंकर बामणे, चंद्रकांत स्वामी, शेख अझरोद्दीन, अनिल बिरादार, उमर शेख, सुधाकर देवकत्ते यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राम मोहन कुरे याच्याविरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने आणखी कुठे गुन्हे केले आहेत. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT