इस्लामपुरामधील घटना सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच : सपकाळ file photo
नांदेड

इस्लामपुरामधील घटना सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच : सपकाळ

मनपाच्या गलथान कारभाराचा गरीब कुटुंबांना फटका

पुढारी वृत्तसेवा

The Incident in Islampur Constitutes Culpable Homicide: Sapkal

नांदेड, पुढारी वृत्तसेवा देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा येथील खड्यात पडून ४ बालकांचा बळी गेल्याची घटना म्हणजे अपघात नसून नांदेड महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा गरीब कुटुंबांना बसलेला फटका आहे. या प्रकरणातील मुख्य ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा सनसनाटी आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली.

इस्लामपुरा येथे काही दिवसांपूर्वी खड्यात पोहोण्यासाठी उत्तरलेल्या ४ शालेय विद्याथ्यांचा मृत्यू झाला. रविवारी नांदेड दौच्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घटनास्थळाला भेट देवून पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खा. रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, हणमंत पाटील बेटमोगरेकर, महेश देशमुख, केदार पाटील, विठ्ठल पावडे, आनंद चव्हाण, राजेश पावडे, प्रा. यशपाल गिंगे, बालाजी चव्हाण, रेखा बव्हाण, त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी नांदेड महानगर पालिकेच्या गलथान कारभारावर सडकून टीका केली.

१२ कोटी रुपयांच्या धातूरमातूर कामांतून मोठ्या प्रमाणावर पैसा हडप करण्यासाठी केलेल्या भ्रष्टाचाराचा हा वळी असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे भ्रष्टाचाराचे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आवाज उठविल्यानंतर काही लोकांवर कारवाई झाली, परंतु मुख्य ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे.

पीडित कुटुंबांना मिळालेली दीड लाखांची मदत अपुरी असून त्यात वाढ करायला हवी. शिवाय प्रत्येक कुटुंबाला एक दुकान देण्याची मागणीही मान्य झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. संसदेच्या आगामी अधिवेशनात खासदार रवींद्र चहाण हे प्रकरण सभागृहात उचलून धरतीलच, शिवाय पक्षाचे गटनेते तसेच आमदार राज्य विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करतील, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

अशोक चव्हाणांच्या उलट्या बोंबा

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी १ मे रोजी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना सपकाळ म्हणाले, चव्हाणांच्या या उलट्या बोंबा आहेत. याआधी अशोक चव्हाण काँग्रेससाठीच मते मागत होते. ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरुस्तीत महिलांना ३३ टक्के आरक्षण कॉंग्रेसनेच प्रथम दिले. त्यावेळी त्यांचे पिताश्री शंकरराव बढ्राण देशाचे गृहमंत्री होते. त्यानंतर अशोक चव्हाण संसद सदस्य असताना ५० टक्के आरक्षण मिळाले, कुठलेही महिला आरक्षण नसताना त्यांच्या पत्नीला काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या. हा सर्व घटनाक्रम पाहता अशोक चव्हाणांचे विधान हास्यास्पद असून ही मोठी विडंबना आहे.

फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर करण्याची मागणी पुढे येत असल्याच्या पार्श्वभूमीवा सपकाळ म्हणाले, देशात कायदा अस्तित्वात असताना आरोपीचे एन्काऊंटर करण्याची काय गरज. गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, अशी आदर्श न्यायप्रणाली बनवावी लागेल. परंतु भाजपालाहे तत्व मान्य नाही. या प्रकरणी फडणवीस यांनी किमान गृहमंत्रीपदाचा तरी राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT