Godavari River : मोदींच्या 'स्वच्छ भारत'ला गोदातिरी तिलांजली !  File Photo
नांदेड

Godavari River : मोदींच्या 'स्वच्छ भारत'ला गोदातिरी तिलांजली !

'नमामि गोदावरी'चे कागदी घोडे नाचण्यात दंग : कचरा, जलपर्णीचे साम्राज्य

पुढारी वृत्तसेवा

The condition of the Godavari River has become pathetic in Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: गोदावरी नदीची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पात्रावर जल पर्णनि अतिक्रमण केले आहे. पाण्याची दुर्गंधी सुटली असून काठ आणि घाट नरकपुरी बनले आहेत. तात्पुरती साफसफाई करून जिल्हा प्रशासन येथेच निर्लज्जपणे दिवाळी पाट साजरी करते, गोवर्धनघाट येथे हिंदूंची स्मशानभूमी असून आपल्या प्रियजनाला अखेरचा निरोप देण्यासाठी येणारे आपल्यापरीने घाणीत भर टाकून जातात. काठावर आणि घाटावर दररोज 'स्वच्छ भारत' आणि 'स्वच्छ महाराष्ट्रा'ला तिलांजली दिली जाते.

राज्य शासनाचा प्रकल्प राज्य शासनाने नामामि गोदा-बरी हा प्रकल्प गोदावरी नदीचे पुनरुज्जीवन आणि सौंदर्याकरण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सुरू केला. नदी प्रद्यण कमी करणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे, नदीचे एकूण पर्यावरण वाढवणे हा या मागचा उद्देश आहे. यात नदी स्वच्छ करणे, नवीन सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे (एटीपी) आणि नदीकाठच्या क्षेत्रांचा विकास करणे यासारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.

गोदावरी नदी स्वच्छ आणि पुनरुज्जीवित करणे, ती अधिक स्वच्छ तसेच निरोगी बनवणे, सांडपाणी पात्रात मिसळण्यापासून रोखणे, सुशोभीकरण प्रकल्पांसह नदीकाठ आणि घाट वाढवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि नदी प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी नवीन एसटीपी बांधणे, नदी संवर्धनाच्या महत्त्वाबद्दल जनसहभाग आणि जागरुकता वाढवणे.

विशिष्ट उपक्रम

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नदीच्या पृष्ठभागावरून आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातून घनकचरा आणि प्रक्षण काढून टाकणे, विद्यमान घाटांचे नुतनीकरण आणि सुधारणा करणे तसेच नवीन घाट बांधणे आदी विशिष्ट उपक्रम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नदीच्या पृष्ठभागावरून आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातून घनकचरा आणि प्रक्षण काढून टाकणे, विद्यमान घाटांचे नुतनीकरण आणि सुधारणा करणे तसेच नवीन घाट बांधणे आदी उपक्रम राबवावे लागणार आहेत. वास्तविक २००८ च्या सुमारास नदीच्या उत्तर बाजुने घाट बांधून झाला. दक्षिण बाजुचा घाट बांधणे राहून गेले. जो घाट बांधला गेला, त्याचे व्यवस्थापन करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली.

सौंदर्याकरण राहिले दूर

नदीकाठच्या परिसरात विहार, उद्याने आणि इतर मनोरंजनाची ठिकाणे विकसित करणे, रोप-वे आणि फेरिस व्हील्स सारखी पर्यटनस्थळे जोडणे, गोदावरी नदीशी संबंधित सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रदर्शनांसाठी जागा तयार करणे, असा नमामि गोदावरीचा उद्देश आहे; परंतु त्याला सर्रास हरताळ फासला जातो आहे. गोदावरीचा उत्तर घाट बांधला तेव्हा कल्पनेचे घोडे प्रचंड वेगाने दौडण्यात आले. अँम्पी थिएटर सुद्धा तयार करण्यात आले. अधिकाधिक पैसा या नावाने मंजूर करुन कसा जिरवता येईल, याचा सुप्त हेतू मात्र नांदेडकरांच्या लक्षात आला नाही. ज्यांनी पैसा जिरवला ते आता लोकांच्या विस्मृतीतही गेले आहेत.

दक्षिणगंगेचे नाभिस्थान

गोदावरी त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे उगम पावते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तिचे पात्र अतिशय अरुंद आहे. परंतु पुढे ती विस्तारत जाते. नांदेड हे गोदावरीचे नाभी स्थान आहे. येथे मात्र पात्र अतिशय विस्तीर्ण आहे. नाशिकचे एक ज्येष्ठ संपादक साहित्यिक आणि अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकदा नांदेडला आले तेव्हा त्यांनी नवीन पुलावरुन गोदावरीचे पात्र पाहून किती कौतूक केले. त्यांची नजर पात्रावरुन हटत नव्हती; परंतु त्यांनी नदीच्या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

घाणच घाण अन् कचरा

गोवर्धनघाट येथे स्मशानभूमीमुळे लोकांचा राबता आहे. यानिमित्ताने निर्माण होणारा कचरा येथेच टाकला जातो. बांबू, कडबा, प्लास्टीकचे कप, ग्लास, कॅरीबॅग, सुतळ्या आदी सर्व साहित्य घाटावर आणि पात्रात फेकले जाते. येथेच नदीतून पकडलेले मासे विक्री केले जातात, येथेच मानवाच्या आणि तराफ्याच्या मदतीने पात्रातून वाळू काढली जाते, थोडेसे दूर महिला कपडे धुतात, दशक्रिया विधीही येथेच करुन काही लोक या घाणेरड्या पाण्यात आंघोळीही करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT