The children's theatre competition will begin in Nanded from today
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या वतीने २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नांदेड येथील कुसुम नाट्यगृह येथे सोमवारपासून (दि.१९) सुरु होत असून, ही स्पर्धा २३ जा-नेवारीपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत दररोज जवळपास ६ नाटक सादर होणार असून नांदेड व परभणी जिल्यातील विविध संस्था व शाळांचा यात सहभाग असणार आहे.
सोमवारी दुपारी साडेबारा वाजता जगण्याचा खो (अष्टविनायक नाट्य कला क्रिडा व सेवा प्रतिष्ठान परभणी), दु. पावणेदोन वाजता जाईच्या कळ्या (बालगंधर्व सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ परभणी), दु. तीन वाजता मौनांतर (बळीराजा विद्यालय, गंगाखेड परभणी), दु. सव्वाचार वाजता बेला (छत्रपती सेवाभावी संस्था सोनपेठ, परभणी), सांयकाळी साडेपाच वाजता खोपा (ज्ञानोपासक विद्यालय कुपटा, सेलू) मंगळवारी (दि.२०) सकाळी ११ वाजता स्काउटर आर फायटर (ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, बोरी, ता. जिंतूर), दु. १२:३० वा. लक्षप्रश्न (एकलव्य मॉडर्न रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंड, नांदेड),
दु. १:४५ वा. मोतीचूर (गोपाला फाऊंडेशन, परभणी), दु. ३ वा. सर तुम्ही गुरुजी व्हा (जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, मानवत), दु. ४:१५ वा. डायरी एका डोंगराची (जिजाऊ ज्ञानतीर्थ सेकंडरी हायस्कूल, परभणी), सांय, ५:३० वा. सक्सेस अॅप (क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्ट परभणी), बुधवारी (दि. २१) स. ११ वा. मराठी डॉट कॉम (नटराज कला विकास मंडळ, जिंतूर), दु. १२:३० वा. हामुरा (नृसिव्ह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी), दु. १:४५ वा. जगण्याचा खो (नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू), दु. ३ वा. कळीचे निर्माल्य (राजीव गांधी युवा फोरम, परभणी),
दु. ४:१५ वा. वाघोबाच्या जाळीत (एन. व्ही. एम. मराठवाडा हायस्कूल, परभणी), गुरुवारी (दि.२२) स. ११ वा. पाऊस (शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, नांदेड), दु. १२:३० वा. ब्लॅक कॅनव्हास (रामरावजी लोहट पब्लिक स्कूल, परभणी), दु. १:४५ वा. तेरा मेरा सपना (श्रीमती एल. एस. आर. कन्या प्रशाला, सेलू), दु. ३ वा. लास्ट बेंच (तन्मय ग्रुप, नांदेड), दु. ४:१५ वा. झाले मोकळे आभाळ (टायनी एंजल्स स्कुल, नांदेड), सांय. ५:३० वा. चला जाऊया रोबोटस पहायला (झपुरझा सोशल फाऊंडेशन, परभणी)
प्रवेश विनामुल्य
शालेय विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलेला वाव देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. प्रवेश विनामूल्य असून, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांसह रसिकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चावरे यांनी केले आहे.