Sukbir Singh Badal Attack pudhari
नांदेड

Sukbir Singh Badal Attack: सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला का केला... निहंग जसपाल सिंगने पोलिसांना काय सांगितलं?

Anirudha Sankpal

Sukbir Singh Badal Attack: शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला निहंग जसपाल सिंह ने केला होता.. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पोलीस तपासात निहंग जसपाल सिंगने ज्यावेळी तो महाराष्ट्रातील नांदेडमध्ये गुरूद्वारामध्ये प्रार्थना करत होता त्यावेळी त्याला वाहेगुरूंनी सांगितला होता.

गुरूवारी नांदेडमध्ये मुगत गुरूद्वारा माता साहेब देवनमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला झाला होता. गुरूद्वाराच्या पायऱ्या उतरत असताना तिथं आपल्या तीन इतर साथीदारांसोबत उभ्या असलेल्या जसपालने आपल्या कृपाण ने हल्ला केला. यामुळं बादल यांच्या हाताला जखम झाली. त्यांना त्वरित खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली असून नांदेड पोलीस तपास करत आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पोलीसांच्या चौकशीत जसपाल सिंगने सांगितलं की, 'मी २०२३ मध्ये या जगातून सन्यास घेतला आहे. मी पुण्यात राहणाऱ्या पत्नी आणि मुलीला साडून दिलं आहे. त्यानंतर मी नांदेडमध्ये निहंग सेवादार झालो.'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निहंग बनण्यापूर्वी सतपाल हा वकील होता. मुंबईतील एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करत होता.

पोलिसांनी सांगितलं की सुखबीर सिंह बादल यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते विमान तळासाठी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी रूग्णालयाने सांगितलं की बादल यांच्यावरील शस्त्रक्रिया ही ९० मिनिटांपर्यंत चालली. त्यांची प्रकृती स्थीर आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये देखील अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ देखील बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात ते थोडक्यात बजावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT