Mahur : माहूरच्या नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेत भाविकांचे प्रचंड हाल तर या गर्दीचा शेतपिकांना फटका बसला आहे.  Pudhari File Photo
नांदेड

Renukadevi Mahur Yatra : परिक्रमा यात्रेतील गर्दीचा फटका शेतकऱ्याला

हजारो भाविकांनी पिके तुडवली; नुकसान भरपाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

माहूर (नांदेड) : दरवर्षीप्रमाणे यंदाही माहूर येथे पारंपरिक परिक्रमा यात्रा उत्साहात पार पडली. मात्र, यात्रेदरम्यान भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे तालुक्यातील गुंडवळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पीडित शेतकरी ज्ञानेश्वर बंडू राठोड यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार देत तातडीने पंचनाम्यासह नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यांच्या शेतकरी राठोड म्हणण्यानुसार, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी झालेल्या माहूर परिक्रमा यात्रेदरम्यान हजारोंच्या संख्येने भाविक मार्गस्थ झाले. या भाविकांनी त्यांच्या मालकीच्या गट क्र. ६९ मधील कापूस व तूर पिक असलेल्या सुमारे १ एकर शेतावरून तुडवत मार्ग काढला.

Nanded Latest News

त्यामुळे पिकांचे गंभीर नुकसान होऊन कुटुंबाच्या उपजीविकेवर संकट ओढावले आहे. या घटनेनंतर राठोड यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून नुकसानीची तातडीने पाहणी व पंचनामा करण्याची, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार माहूर, आमदार भीमराव केराम तसेच तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.

स्थानिक शेतकरी व नागरिकांनी यात्रेदरम्यान शेतजमिनींचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्षम नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, पीडित शेतकऱ्याला त्वरीत न्याय देऊन झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT