Nanded News : कामगार कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट वाढल्याने खरे लाभार्थी वंचित  Pudhari News Network
नांदेड

Nanded News : कामगार कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट वाढल्याने खरे लाभार्थी वंचित

अनुदान घेणारेही आता चौकशीच्या रडारवर ऑनलाईनमुळे बोगसगिरी वाढली

पुढारी वृत्तसेवा

Real beneficiaries are deprived due to increased presence of agents in labor offices

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मदतीच्या योजनेमध्ये ४ बनावट लाभार्थी आढळले. त्यांनी बनावट प्रमाणपत्र बनवून २ लाखांचे अनुदान लाटले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणात आता ज्यांनी यापूर्वी योजनांचा लाभ घेतला त्यांची पण, चौकशी केली जाणार असून त्यांच्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनुदान घेणारेही आता चौकशीच्या रडारवर असणार आहेत.

सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विविध प्रकारच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जवळपास २२ योजना राबविण्यात येतात. यात अडीच हजार योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून ऑनलाइन प्रक्रिया करण्यात आली आहे. शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज सादर करण्यात येतो.

त्यानंतर कामगार अधिकारी ऑनलाईन अर्ज पडताळणी करून त्याला मान्यता देतात. बहू वेळेला या कागदपत्रांची शहनिशा होत नाही. एखादाच अधिकारी याची प्रत्यक्ष खात्री करतो. जे आजच्या प्रकरणातून उघडकीस आले. तसेच पूर्वी स्वतः कामगार कार्यालयात अर्ज घेऊन येत होते. त्यामुळे तो प्रत्यक्षात कामगारच आहे का? हे त्याच्याकडे पाहताच याची खात्रीही होत होती. मात्र, आता ऑनलाइनमुळे सर्व गोष्टी एजंट मार्फत होत आहेत. मुळ कामगार कार्यालयात फिरकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे बोगस कामगारांचे चांगलेच फोफावते. चार चाकी घेऊन फिरणारेही योजनेचे लाभार्थी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता अनुदान घेतलेल्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. यामुळे बोगस लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ होऊ शकते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच कारभार...

कामगार कार्यालयात नियमित सेवेतील कर्मचारी हे नेहमी कोणते ना कोणते कारण सांगून गैरहजर असतात. या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कारभार चालतो. त्यामुळे ते जबाबदारीने व काळजीपूर्वक याकडे म्हणावे तसे लक्ष देत बसल्याचे दिसून येते. मात्र, या कारवाईमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

नोंदणीकृत कामगारांचा लेखाजोखा

बांधकामचे ४९, १५८ कामगार आहेत. जुलै अखेर २०६९६ लाभार्थी कामगारांना २६,५६,४८,८२९ एवढा आर्थिक लाभ देण्यात आला. घरेलूचे १९९८४ कामगार असून २६४ लाभार्थी कामगारांना २१, ३५,००० एवढा आर्थिक लाभ देण्यात आला. तर, ५६९९ माथाडी कामगार असून यात ८५० कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनावर ३० टक्के लेव्ही रक्कम मालकाकडून घेण्यात येते. लेव्हीच्या रकमेतून माथाडी कामगारांना भविष्य निर्वाह निधी, उपदान, विमा व बोनस आदी सुविधा पुरविण्यात येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT