नायगाव : पावसाने नदी नाल्यांना पूर; मुग, उडदाचे प्रचंड नुकसान  Nanded Rain
नांदेड

नायगाव : पावसाने नदी नाल्यांना पूर; मुग, उडदाचे प्रचंड नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : नायगाव तालुक्यात प्रदीर्घ कालावधीनंतर शनिवार व रविवार या दिवशी दमदार पाऊस झाला आहे. या पावसाने हाता तोंडाशी आलेल्या मुग, उडीद या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तर इतर पिकाला व जनावराच्या चाऱ्याला पावसाचा आधार भेटला आहे. भविष्यात असाच मोठा पाऊस झाल्यास आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

नायगाव तालुक्यात शनिवार व रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसामुळे नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून मन्याड धरण भरले आहे. यामुळे मण्याड नदी व कैनाल मध्ये जोराच्या पावसाने पाण्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी व नाल्याच्या काठावरील पिकामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसाच्या प्रमाणात वाढ होणार असे हवामान खात्याने सांगितले असल्याने सर्वत्र सतर्कता बाळगली आहे.

गोदावरी नदी व मन्याड नदीच्या मध्ये येनारा नायगाव तालुका या भागात अती पाऊस झाल्यास अतिवृष्टीने आपरिमीत नुकसानीचा ठरणारा असून सतर्कता बाळगत प्रशासनाकडून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

आपत्कालीन प्रशासकीय टीम सज्ज

शनिवारी व रविवारी झालेल्या दमदार पावसामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाने भविष्याच्या पावसाच्या प्रमाणाची दक्षता घेत आवश्यक उपाय योजना करण्याचे ठरवले आहे. या दृष्टीने आपत्कालीन प्रशासकीय टीम सज्ज ठेवली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT