हिब्बट येथे अजगर पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.  (Pudhari Photo)
नांदेड

Python Caught | हिब्बट येथे १० फूट लांबीचा अजगर पकडून गावकऱ्यांनी दिला वनविभागाच्या ताब्यात

Nanded News | मुखेड तालुक्यात पहिल्यांदाच इतका मोठा अजगर सापडल्याने परिसरात उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

Mukhed python Caught

मुखेड : तालुक्यातील येवती बिट अंतर्गत हिब्बट येथील शेतकरी भिमराव नारायण मुंडे यांच्या शेतात अंदाजे १० फूट लांबीचा अजगर आढळून आला. ही घटना आज (दि. २३) सकाळी ९.३० वाजता घडली. शेतात अजगर दिसताच संभाजी गणपती कांगणे, अदिनाथ कांगणे आणि गावकऱ्यांच्या मदतीने अजगराला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.

यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपाल मारुती पानगटवार, येवती बिटच्या वनरक्षक स्वाती उत्तमराव मुंडे आणि अनिल अडगुलवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि अजगराला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी अजगराला तालुका वनविभाग कार्यालयात नेण्यात आले असून, लवकरच त्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

अजगर अंदाजे ८ फूट लांब आणि सुमारे १० किलो वजनाचा आहे. मुखेड तालुक्यात पहिल्यांदाच इतका मोठा अजगर सापडल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने पाहण्यासाठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT