Maharashtra Police Pudhari
नांदेड

Nanded News : महामार्गावरील 'ते' प्रकरण भोवले!

पोउपनि अन्येबोईनवाड यांची नियंत्रण कक्षात बदली

पुढारी वृत्तसेवा

Police Sub-Inspector Anyeboinwad transferred to the control room

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दत्तचौक (टी पॉईंट) परिसरात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात संलग्न करून तात्काळ नांदेड येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी याबाबत दि. ७ मार्च रोजी आदेश देत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना अन्येबोईनवाड यांना कार्यमुक्त करून तसा अनुपालन अहवाल कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दत्तचौक (टी पॉईंट) येथे दि. २ मार्च रोजी सकाळी सुमारास एका टिपर चालकाची पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड यांनी रॉयल्टी संदर्भात चौकशी केली.

यावेळी एका या युवकाने मोबाईलवर त्याचे चित्रण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अन्येबोईनवाड संतापले आणि त्याच्यावर धावून गेले. या घटनेत दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. या प्रकारामुळे महामार्गावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, या घटनेनंतर माहूर पोलीस ठाण्यात गेलेल्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही पुढे आला. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने याबाबत कारवाई करीत पोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांची बदली केली असावी, अशी चर्चा आता परिसरातून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT