नांदेड जिल्हात जुगार अड्डयांवर छापा file photo
नांदेड

नांदेड : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 27 जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कंधार,पुढारी वृत्तसेवा

कंधार शहरामध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळत असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी (दि.१७) धाड टाकली आणि कारवाई केली. यावेळी पोलिसांनी जुगार अडड्यावरुन २ लाख ९३ हजार रोकड आणि मोबाईल, जुगाराचे साहित्य असे एकूण ७ लाख ६४ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी कंधार पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या व जुगार अड्डा चालवणाऱ्यांसह २७ आरोपींविरुद्धात गुन्हा दाखल केला आहे. या जुगाराच्या धाडीतील आरोपींमध्ये २३ जण कंधार शहरातील आहेत. तर मानसपुरी ,कासारखेड नांदेड, पिंपळगाव, सुजलेगाव येथील प्रत्येकी १ जण असे एकूण २७ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने

शहरामध्ये एका ठिकाणी विनापरवाना व बेकायदेशीररित्या एकत्र गोलाकार बसून पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी मंगळवारी (दि.17) धडक कारवाई करत पोलिसांनी छापा टाकला. जुगाराचे साहित्य,नगदी रोकड व मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला. पोलिस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिस स्टेशनमध्ये २७ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सानप करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT