नांदेड : विधानसभा सार्वत्रिक आणि नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवार (दि.नऊ) दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा असज न परिसरातील मोदी मैदानावर होणार आहे. या जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन आ. बालाजी कल्याणकर यांनी केले आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षाच्या काळात जो विकास झाला आहे तो विकास केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारमुळे शक्य झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा शनिवारी होत आहे.