वयवर्ष ८५ प्लस मतदारांची संख्या झाली ३५ हजारांवर pudhari photo
नांदेड

Assembly Election : वयवर्ष ८५ प्लस मतदारांची संख्या झाली ३५ हजारांवर

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात विधानसभेच्या नऊ मतदारसंघात ८५ वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या ३५ हजार ८०३ एवढी आहे. यात एकाही तृतीयपंथाची नोंद नाही. दरम्यान, आजवांपेक्षा आज्यांची संख्या जवळपास दुप्पट आहे. आजोबांची संख्या १३ हजार ४७३ तर आजींची संख्या २२ हजार ३३० आहे.

८५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे मत त्यांच्या घरी जावून नोंदवून घेण्याचा यशस्वी प्रयोग लोकसभा निवडणुकीला पार पडला. आत्ता, विधानसभा निवडणुकीसाठी त्याचे स्वरूप व्यापक करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्य निवडणुक आयुक्तांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. निवडणुक यंत्रणा संबंधित मतदान अधिकार्यासह नोंदणी केलेल्या मतदाराच्या घरी जाऊन त्याचे मत नोंदवून घेताना संपूर्ण पारदर्शकता पाळणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना ही संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात येणार असल्याचे केले.

निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक जे शतकोत्तरी प्रवासाला निघालेले आहेत, आणि ४० टक्यांपेक्षा अधिक अपंग असलेले मतदार लोकसभेप्रमाणे यावेळी सुद्धा मतदानापासून वंचित राहणार नाहीत. लोकसभेलासुद्धा अशांचे मत नोंदवून घेण्यात आले होते. त्यासाठी १२ क्रमांकाचा अर्ज मात्र संबंधिताना भरून निवडणुक यंत्रणेकडे द्यावा लागणार आहे. अशांची नावे मतदार यादीत येतील. नदिड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ८५ वर्षपिक्षा अधिक वय असलेल्यांची संख्या केवळ ५९२ होती. तर दिव्यांग मतदारांची संख्या १०७ होती.

आता विधानसभा निवडणुकीसाठी मात्र ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसभेच्या वेळेस अशा मतदारांसाठी घरपोच मत नोंदविण्यासाठी जी यंत्रणा राबविण्यात आली होती, त्या प्रत्येक पथकात दोन मतदान अधिकारी, एक मायक्रो ऑब्झरवर, एक फोटोग्राफर, एक पोलिस कर्मचारी आणि या पथकाला संबंधित मतदाराचे घर दाखविण्यासाठी एक मतदान केंद्र अधिकारी अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली होती.

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे नऊ मतदारसंघ असून त्यानिहाय ८५ वषपिक्षा अधिक मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे (कंसात महिला मतदरांची संख्या)

किनवट १०१४ (१९६१)

हदगाव १८१० (३०२५)

भोकर १५३४ (२६७५) नांदेड उत्तर १८८८ (२३७३) नांदेड दक्षीण १७१९ (२३८५) लोहा - १५८६ (२६४४)

नायगाव १२३६ (२३७२) देगलूर - १३९८ (२६२९)

मुखेड १२८८ (२२६६)

याप्रमाणे एकूण पुरुष वयोवृद्ध मतदारांची संख्या १३ हजार ४७३ तर महिला मतदारांची संख्या २२ हजार ३३० अर्थात एकृष्ण ३५ हजार ८०३ मतदार ८५ वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT