तुरीच्या नव्या वाणामुळे कृषी क्षेत्रात होणार आमूलाग्र बदल pudhari photo
नांदेड

Agriculture News : तुरीच्या नव्या वाणामुळे कृषी क्षेत्रात होणार आमूलाग्र बदल

मका उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणार मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः भारतातील शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी डीसीएम श्रीराम लिमिटेडच्या श्रीराम फार्म सोल्युशन्सने पुढाकार (इनिशियेटीव्ह) घेतला आहे. अत्याधुनिक पीक संरक्षण प्रणाली, विशेष वनस्पती पोषण आणि संशोधनाधारित बियाणे उत्पादने बाजारात आणली आहेत. विदर्भातील प्रमुख चॅनेल भागीदार आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नागपुरात पार पडलेला हा सोहळा कृषी क्षेत्रासाठी एक नवी आशादायक सुरुवात ठरणार आहे.

बदलता हवामान आणि वाढत्या किडींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी कंपनीने जागतिक दर्जाचे पेटंटप्राप्त तंत्रज्ञान आणले आहे. यामध्ये श्रीराम सेनकुशा हे जपानी तंत्रज्ञानावर आधारित कीटकनाशक सादर करण्यात आले आहे, जे फवारणीनंतर अवघ्या 30 मिनिटांत पावसाचा परिणाम सहन करू शकते.

फलोत्पादनातील महत्त्वाच्या रोगांवर मात करण्यासाठी श्रीराम झारविन हे भारतातील पहिले पेटंटप्राप्त बुरशीनाशक आणले गेले आहे, तर मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी श्रीराम एडेलॉन हे प्रभावी तणनाशक वरदान ठरणार आहे. याशिवाय, जमिनीचे 360 अंश आरोग्य सुधारण्यासाठी आणि उत्पादनाचा दर्जा टिकवण्यासाठी श्रीराम फर्मप्लस आणि श्रीराम सिम्बिओ ही जैविक पोषण उत्पादने लाँच करण्यात आली आहेत. तसेच, तूर उत्पादकांसाठी कमी आणि जास्त कालावधीचे दोन विशेष संशोधनाधारित वाण उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

श्रीराम फार्म सोल्युशन्सचा मका बियाणे उत्पादनांचा लोकार्पण सोहळा नागपूर येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमात विविध तृणनाशक, कीटकनाशक व तूर व मकाचे नवीन बियाण्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्रीराम फार्म सोल्युशन्सचे कार्यकारी संचालक व व्यवसाय प्रमुख संजय छाब्रा म्हणाले, श्रीराम फार्म सोल्युशन्समध्ये नवोन्मेष आमचे ध्येय नाही, आम्ही सेवा देत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिलेले आमचे वचन आहे.

या नव्या उत्पादनांचे लोकार्पण आधुनिक शेतीच्या क्षमतांना नव्याने परिभाषित करण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अत्याधुनिक बियाणे, पीक संरक्षण आणि पीक पोषण उपाय थेट शेतकऱ्यांच्या हातात देऊन आम्ही त्यांना केवळ अधिक चांगली पिके घेण्यासाठी नव्हे, तर अधिक उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सक्षम करत आहोत. हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतीचे चित्र बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणेल, असा विश्वास छाब्रा यांनी व्यक्त केला.

बुरशीनाशक व तृणनाशक गुणकारक

श्रीराम सेनकुशा हे कीटकनाशक फवारणीनंतर अवघ्या 30 मिनिटांत पावसाचा परिणाम सहन करू शकते. श्रीराम झारविन हे बुरशीनाशक फलोत्पादनासाठी गुणकारी आहे. तर मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी श्रीराम एडेलॉन हे प्रभावी तणनाशक वरदान ठरणार आहे. जमिनीचे आरोग्य सुधारणे व दर्जा टिकवण्यासाठी श्रीराम फर्मप्लस आणि श्रीराम सिम्बिओ ही जैविक पोषण उत्पादने परिणामकारक आहेत. तूर उत्पादकांसाठी कमी आणि जास्त कालावधीचे दोन विशेष संशोधनाधारित वाण उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT