Nanded Rural Police Motorcycle Theft Case Solved Pudhari
नांदेड

Bike Theft Nanded | सीसीटीव्हीने फोडले दुचाकी चोरीचे गूढ; 2 दुचाकी जप्त; अल्पवयीन ताब्यात

सीसीटीव्ही फुटेजने दुचाकी चोराचा छडा; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nanded Rural Police Motorcycle Theft Case Solved

नवीन नांदेड : घरासमोर उभी केलेली मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटनेचा नांदेड ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने छडा लावला आहे. या प्रकरणी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

असर्जन येथील रवी नवघरे यांची मोटारसायकल २६ नोव्हेंबर रोजी घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

गुन्हे शोध पथकाचे एपीआय कपिल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान संबंधित बालकाने आणखी एक मोटारसायकल चोरी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर बालकाच्या वडिलांनी चोरीच्या दोन्ही मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात दिल्या. पोलिसांनी ही वाहने जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

या कारवाईत विष्णू खिलारे, बालाजी यादगिरवाड, समीर अहमद, कमलाकर सदावर्ते आणि हणमंत तेलंग यांनी सहभाग घेतला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरीच्या दोन घटनांचा उलगडा केल्याने या कारवाईचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT