प्रज्ञा गजानन चव्हाण Pudhari
नांदेड

Nanded Accident | उमरखेड-पुसद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील शिक्षिकेचा मृत्यू

कृषी महाविद्यालयाच्या गेटसमोर अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Pusad Road Accident

उमरखेड : कुपटी येथील दादाराव मोरे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका प्रज्ञा गजानन चव्हाण (इंगळे) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी (दि.७) सकाळी साडेसातच्या सुमारास उमरखेड-पुसद राज्य मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या गेटसमोर हा अपघात झाला.

प्रज्ञा चव्हाण या दुचाकी ( एमएच २९ एव्ही ७३८२) वरून उमरखेडहून कुपटी येथील शाळेकडे जात होत्या. कृषी महाविद्यालयाच्या गेटसमोर पोहोचल्या असता मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रज्ञा चव्हाण यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा दहावीच्या वर्गात, तर मुलगी चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्यांच्या अपघाती निधनाची वार्ता कुपटी परिसरात पसरताच गावावर शोककळा पसरली.

दरम्यान, उमरखेड-पुसद मार्गावर सध्या रेल्वेचे काम सुरू आहे. या कामासाठी मुरूम वाहतूक करणारी हायवा वाहने दिवस-रात्र या मार्गावरून धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वाहनांवर ‘ऑन ड्युटी रेल्वे’ असे फलक लावलेले असल्याचेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरील वाहनांच्या वेगावर व वाहतुकीवर संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास पोफाळी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT